Education News : टीईटी, जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचे अस्त्र! नाशिकमध्ये शाळांना मिळाली 'अघोषित सुटी'
Massive Response to Statewide Teacher Protest in Nashik : नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर टीईटी सक्ती रद्द करण्यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करणारे शिक्षक. या राज्यव्यापी आंदोलनामुळे शुक्रवारी शहरातील व जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये कामकाज ठप्प झाले होते.
नाशिक: शिक्षकांनी पुकारलेल्या बंदमुळे शुक्रवारी (ता. ५) शहरासह जिल्हाभरातील बहुतांश शाळांमध्ये शुकशुकाट बघायला मिळाला. आंदोलनामुळे शाळांना अघोषित सुटी मिळाली. दरम्यान, इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये सुरळीतपणे कामकाज पार पडले.