esakal | सुरवातीला बोंबाबोंब, आता केंद्रे ओस; लस देण्यासाठी माणसांची शोधाशोध
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

नाशिक : लसीकरणासाठी सुरवातीला बोंबाबोंब, आता केंद्रे ओस

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा (Corona Vaccination) पहिला व दुसरा डोस मिळविण्यासाठी दीड महिन्यांपूर्वी पहाटे रांगा लावण्याबरोबरच वशिलेबाजीतून लस घेण्याकडे कल होता. परंतु, आता लसीकरण केंद्रांची वाढलेली संख्या लक्षात व उपलब्ध डोसचे प्रमाण वाढल्यानंतर केंद्रे ओस पडली आहेत. लस टोचण्यासाठी माणसे शोधण्याची वेळ आता आरोग्य कर्मचाऱ्यांवर आल्याने जनजागृतीच्या माध्यमातून लसीकरणासाठी आवाहन केले जात आहे.


शहरात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात लशींचा तुटवडा जाणवतं होता. त्यामुळे केंद्रावर जाऊन लस घेण्यासाठी मोठी स्पर्धा लागली होती. वयोवृद्ध नागरिक केंद्रांवर भल्या पहाटेपासून रांगा लावूनही लस मिळत नव्हती. दुसरीकडे निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चमकोगिरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केंद्रांची मागणी झाली. सुरवातीला वीस केंद्रांचे वाटप करण्यात आले. कालांतराने केंद्रे वाढत गेली. आता १५२ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे, तर ३२ खासगी रुग्णालयांमध्येदेखील सुविधा उपलब्ध आहे.

हेही वाचा: धुळगावचे सुपुत्र जवान सचिन गायकवाड अनंतात विलीन!

कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन बरोबरच रशियन बनावटीची ‘स्पुटनिक-व्ही’ लस नाशिकमध्ये उपलब्ध आहे. लशींचा मोठा साठा उपलब्ध झाल्यानंतर आता केंद्रे ओस पडली आहे. नाशिक शहरात १८ वर्षापेक्षा १३ लाख ६३ हजार ७०४ नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले होते. त्यात आतापर्यंत नऊ लाख ८ हजार ९२२ नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

टक्केवारीत हे प्रमाण ६७ टक्के आहे. चार लाख २४ हजार १८९ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. त्याचे प्रमाण ३१ टक्के आहे. चार लाख ५४ हजार ७८२ नागरिकांना अद्यापही पहिला तर नऊ लाख ३९ हजार ५१५ नागरिकांना दुसऱ्या डोसची प्रतिक्षा आहे. त्यामुळे आता कधी काळी स्वतःहून डोस घेण्यासाठी दाखल होणाऱ्या नागरिकांपैकी शिल्लक राहिलेल्या नागरिकांना डोस घेण्यासाठी प्रवृत्त केले जाणार असून, त्यासाठी जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. त्याचा एसएमएस केले जात असून, नगरसेवकांचीदेखील मदत घेतली जात आहे.

हेही वाचा: बारा तासांत ३२ हजाराने कोसळला कोथिंबिरीचा दर; उत्पादक चिंतेत

१५२ केंद्रांवर मोठ्या प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध आहे, मात्र नागरिकांची गर्दी नसल्याने केंद्रे ओस पडली आहे. नागरिकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त केले जाणार असून, त्यासाठी जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे.
- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका.

loading image
go to top