नाशिक: राखीव निधी घटवत सभासदांना वाढीव लाभांश द्यावा, अशी एकमुखी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स ॲन्ड नॉनटीचिंग एम्प्लॉइज को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या सभासदांनी केली. तांत्रिक अभ्यास करून लाभांश जाहीर करणार असल्याची भूमिका घेत, कार्यकारिणी मंडळाने रविवारी (ता. २४) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत लाभांश जाहीर केला नाही. चर्चेदरम्यान अन्य काही मुद्यांवर सभासदांमध्येच जुंपली होती.