Teachers’ Protest
sakal
नाशिक: शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्याचा निर्णय रद्द करण्यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी शहरासह जिल्हाभरातील शिक्षक शुक्रवारी (ता. ५) रस्त्यावर उतरले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको करत निषेध नोंदविला. शिक्षकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देत चर्चा केली.