Bhaubeej 2023: वर्दीतली भावाची माया अन् बहिणी गहिवरल्या! पोलिस पथकाची आधाराश्रमात भाऊबीज

A team of City Crime Branch Unit 1 celebrating bhaubeej with the girls of Aadharashram.
A team of City Crime Branch Unit 1 celebrating bhaubeej with the girls of Aadharashram.esakal

Bhaubeej 2023: वर्दीतली भावाची माया आणि बहिणी गहिवरल्या, असे चित्र आधाराश्रमात बघावयास मिळाले. निमित्त होते ते भाऊबीजेचे. शहर पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शोध पथक युनिट १ पथकाचे अधिकारी, कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत त्यांनी आधाराश्रमातील मुलींसह भाऊबीज साजरी करत त्यांना भावाच्या मायेची सावली दिली.

गेल्या आठ दिवसांपासून सर्वत्र उत्साहात दिवाळी साजरी होत होती. दिवाळी पर्वात येणारे विविध सण प्रत्येक जण आपल्या कुटुंबीयांबरोबर आनंदात साजरे करत होते.

भेटवस्तू देणे-घेणे, मिठाई फराळाचा आस्वाद, फटाके उडविणे अशा विविध प्रकारे आपला आनंद व्यक्त करत होते. (team of City Crime Branch Unit 1 police celebrate bhau beej with girls of Adharashram nashik news)

तर दुसरीकडे मात्र काही घटक असे होते, की जे आपल्या कुटुंबीयांपासून दुरावलेले होते. आपुलकीची ओढ त्यांना लागलेली होती. या घटकांमध्ये काही आपल्या कर्तव्यामुळे कुटुंबाच्या सहवासातून दूर होते, तर काही घटक निराधार असल्याने कुटुंबीयांपासून पोरके झाले होते. शहरातील आधाराश्रमात या दोन्ही घटकांनी एकत्र येत आपले कुटुंब आणि मायेची कमी भरून काढली.

भावाच्या मायेपासून वंचित असलेल्या आणि भाऊराया यावा, यासाठी वाटेवर नजरा लावून बसलेल्या निरागस बहिणींना भावाची माया देण्यासाठी सरसावले ते युनिट १ पथकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पावले. पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांनी आपल्या पथकासह भाऊबीजनिमित्ताने आधाराश्रमातील मुलींची भेट घेतली. त्यांच्यासह भाऊबीज, तसेच दिवाळी साजरी करण्याचा आनंद लुटला.

A team of City Crime Branch Unit 1 celebrating bhaubeej with the girls of Aadharashram.
Nashik Diwali Vacation: दूरदृष्टीअभावी सुट्यांमध्ये नाशिककरांची तारांबळ; मनोरंजनासाठी अन्य शहरांकडे जाण्याची वेळ

भाऊरायाच्या मायने दुरावलेल्या त्या मुलींनीही कुटुंबाचा सहवास अनुभवत सर्वांचे औक्षण करून त्यांच्यासाठी प्रार्थना केली. या आगळ्यावेगळ्या भाऊबीजनिमित्त त्या भावांनीही आधाराश्रमातील आपल्या बहिणींना भेटवस्तू देत शुभेच्छा दिल्या. भावाच्या मायेरूपी आशीर्वाद देऊन सदैव त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे भावांनी वचन दिले.

अशा भावनिक सोहळ्याने त्या निरागस बहिणींसह त्यांना भावाची माया देण्यासाठी आलेल्या भावांना, तसेच उपस्थितांना गहिवरून आले. कुणीही आपल्या कुटुंबीयांपासून कधीही दुरावू नये, सर्वांनी नेहमी एकत्र राहावे, कुटुंबाचे महत्त्व काय असते हे या सोहळ्यातून दिसून आले. त्याचप्रमाणे भाऊरायाची मिळालेली माया व त्यांच्याकडून मिळालेली भेटवस्तू यामुळे त्या मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद सर्वांना समाधान देऊन जात होता.

A team of City Crime Branch Unit 1 celebrating bhaubeej with the girls of Aadharashram.
Fire Accident: दिवाळीत शहरात 20 आगीच्या घटना; आगीपासून बचाव करण्यासाठी कार्यरत, कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ड्यूटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com