Nashik Bank Fraud : बँक कर्मचारी, दलाल आणि तहसीलदार! नाशिकमध्ये १२ लाखांची खंडणी मागून फसवणूक; ७ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल.
Former Tehsildar Naresh Bahiram Booked Again After ACB Arrest : बँकेत तारण ठेवलेली मिळकत आणि कर्ज परतफेडीच्या प्रकरणात विजय पाटील यांची खंडणी मागून १२ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार नरेशकुमार तुकाराम बहिरम यांच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक: बँकेत तारण ठेवलेल्या मिळकतीवर कर्ज घेतल्यावर त्याची परतफेड करताना बँकेच्या संशयित कर्मचाऱ्यांसह दलाल आणि तत्कालीन तहसीलदाराने खंडणीची मागणी करीत सुमारे १२ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.