Nashik News : तहसीलदारांनी सहकाऱ्यांसह सर केला अंकाई-टंकाई किल्ला; 36 जणांचा सहभाग

Niphad Tahsildar Sharad Ghorpade along with revenue department colleagues at fort ankai tankai.
Niphad Tahsildar Sharad Ghorpade along with revenue department colleagues at fort ankai tankai.esakal

चांदोरी (जि. नाशिक) : शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य नीट राहत नाही, तोवर कार्यक्षमतेने काम करता येत नाही, ही बाब ओळखून निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्याकडेही आवर्जून लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत. महसूल खात्यात काम करताना कमालीच्या ताण-तणावाला सामोरे जावे लागते, कर्मचाऱ्यांना मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य लाभावे, या उद्देशाने निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांनी महसूल कर्मचारी यांच्यासाठी अनोखा उपक्रम राबवीत सहकाऱ्यांसह शनिवारी (ता.२६) अंकाई किल्ल्यावर भेट दिली. (Tehsildar of niphad sharad ghorpade gave surprise trip to colleagues at Ankai Tankai fort nashik Latest Marathi News)

महसूल विभाग राज्य शासनाचा अतिशय महत्त्वाचा विभाग आहे. महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. अलिकडे महसूल विभागाला अनेक प्रकारची कामे करावी लागतात. नागरिकांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. या अपेक्षा पूर्ण करताना ताण येणे साहजिकच आहे. त्यामुळे तहसीलदार शरद घोरपडे यांनी उपक्रम राबवीत आहेत. येवला तालुक्यातील मुघलशाही, निजामशाही आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला अंकाई-टंकाई किल्ला. या किल्ल्याला तहसील कर्मचाऱ्यांनी भेट देत किल्ल्यावरील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतला. शिवाय तेथील पर्यटकांसोबत मनसोक्तपणे गप्पा मारून किल्ल्याची माहिती जाणून घेतली.

ट्रेकिंगसाठी अशी पूर्वतयारी

साधारणपणे एक महिन्यांपूर्वी व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला. त्यावर ट्रेकिंग संदर्भात नियमितपणे सूचना दिल्या गेल्या. चालण्याची तयारी, शारीरिक तंदुरुस्त हे लक्षात घेता ३६ अधिकारी कर्मचारी यात सहभागी झाले. अंकाई किल्ल्यावर पर्यटन करत असताना स्वच्छता अभियान ही राबविले गेले.

हेही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

Niphad Tahsildar Sharad Ghorpade along with revenue department colleagues at fort ankai tankai.
Champa Shashti : गंगाघाटावर भाविकांची उसळली गर्दी; येळकोट, येळकोट जय मल्हारचा गजर!

व्यायामामुळे आरोग्य-दीर्घायुषी

व्यायामात् लभते स्वास्थ्यं दीर्घायुष्यं बलं सुखं।

आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम्॥

संस्कृत श्‍लोक आहे हा. अर्थात, व्यायामामुळे आरोग्य, दीर्घायुष्य, शक्ती आणि आनंद मिळतो. निरोगी राहणे सर्वोच्च आनंददायी असून आरोग्य हे सर्व उद्दिष्ट साध्य करण्याचे साधन आहे.

"शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य नीट राहत नाही. तोवर कार्यक्षमतेने काम करता येत नाही. ही बाब ओळखून महसूल कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्याकडेही आवर्जून लक्ष देण्यासाठी महिन्यातून एकदा उपक्रम राबवतोय." - शरद घोरपडे, तहसीलदार, निफाड

"या ट्रेकिंगमुळे मनावरील ताण-तणाव कमी होण्यास मदत झाली. महसूल कर्मचारी हे देखील माणसेच आहेत, त्यांच्यावरही कमालीचा ताण असतो. तो दूर झाल्यास त्यांची कार्यक्षमता वाढू शकते, या उद्देशाने आयोजित ट्रेक स्तुत्य आहे." - निखिल शिरोडे, मंडलाधिकारी

"ट्रेकिंगची ही संकल्पना अनोखी ठरतानाच आरोग्याची काळजी, ताणतणाव दूर करणारी आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्यातील प्रेमभाव जोपासताना स्नेहपूर्ण ऋणानुबंध वाढले गेले."

- गीता कनोज, तलाठी, आहेरगाव

Niphad Tahsildar Sharad Ghorpade along with revenue department colleagues at fort ankai tankai.
SAKAL Exclusive : कापसाच्या अतिरिक्त 50 लाख गाठींच्या निर्यातीची गरज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com