
नाशिक : तापमान घसरून पोचले ७.८ अंशांवर
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील गारठा वाढला आहे. अशात सध्या दिवसा कडक ऊन आणि सायंकाळनंतर गारठा, अशा संमिश्र वातावरणाची अनुभूती नाशिककर घेत आहेत. शनिवारी (ता. २९) नाशिकचे किमान तापमान ७. ८ अंश सेल्सिअस नोंदविले आहे.
हेही वाचा: SBI चा नियम 1 तारखेपासून बदलणार! ग्राहकांना होणार मोठा फायदा
गेल्या मंगळवारी (ता. २५) नाशिकचे किमान तापमान ६.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. मात्र त्यानंतर सातत्याने पारा वाढत चालला होता. शुक्रवारी (ता. २८) नाशिकचे किमान तापमान १०.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. पुन्हा पाऱ्यात घसरण झाली असून, शनिवारी नाशिकचे किमान तापमान ७. ८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. तर कमाल तापमान २८.६ अंश सेल्सिअसची नोंद झालेली आहे. दरम्यान, आभाळ स्वच्छ राहात असल्याने सध्या दिवसा कडक ऊन पडत आहे. सायंकाळनंतर मात्र वातावरणात गारवा जाणवत आहे. रात्रीच्या वेळी थंडीत शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत असल्याची सध्याची स्थिती आहे.
Web Title: Temperature Dropped 7 8 Degrees Nashik Cold
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..