Meeting at Shri Kalika Mandir
sakal
नाशिक: राज्यभरात अतिवृष्टीमुळे आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी जिल्ह्यातील देवस्थानेही सरसावली आहेत. धर्मादाय सहआयुक्त विवेक सोनुने यांच्या उपस्थितीत कालिका मंदिर सभागृहात झालेल्या बैठकीत नाशिक व परिसरातील देवस्थानांनी सामाजिक बांधिलकी जपत पंचवीस लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. बैठकीत जिल्ह्यातील देवस्थानांकडून सुमारे एक कोटी रुपये मदत देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.