कारवाईची बांधकाम विभागाकडून तात्पुरती मलमपट्टी | latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pwd latest marathi news

कारवाईची बांधकाम विभागाकडून तात्पुरती मलमपट्टी

नाशिक : एकदा रस्ता तयार झाल्यानंतर तीन वर्ष तो रस्ता देखभाल व दुरुस्तीसाठी संबंधित ठेकेदाराकडे असतो. त्यामुळे किमान तीन वर्ष तरी रस्ता सुस्थितीत असावा, अशी अपेक्षा असते. मात्र, पावसाळ्यात डिफेक्ट लायबिलिटी असलेल्या रस्त्यांवरच मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने गुणवत्तेचे पितळ उघडे पडले.

त्यामुळे बांधकाम विभागाने नागरिकांचा रोष आणखी वाढू नये म्हणून घाईघाईने १४ ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावत सोपस्कार पार पाडल्याचे दर्शविले आहे. मात्र, ठेकेदारांकडून रस्ते दुरुस्त करून घेतले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Temporary Bandage of Action by PWD Nashik latest marathi news)

मागील दोन वर्षात शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते तयार करण्यात आले. जवळपास साडेसहाशे कोटी रुपये किमतीचे रस्ते तयार करताना संबंधित ठेकेदारांना तीन वर्षासाठी दायित्व अर्थात डिफेक्ट लाइव्ह परेड देण्यात आला होता.

मात्र, यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांची इतकी धूळधाण उडाली की उन्हाळ्यात गुळगुळीत रस्त्यांवरून फिरणाऱ्या नाशिककरांना रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाळवंटात फिरत असल्याचा अनुभव येत आहे. डिफेक्ट लायबिलिटी असलेल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने गुणवत्तेचे पितळ उघडे पडले आहे.

हेही वाचा: Nashik : चला गं... मंगळागौरीचा करूयात जागर !

बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे सहा विभागात १४ ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

यात पंचवटी विभागात दोन नाशिक रोड व पूर्व विभागात प्रत्येकी तीन, पश्चिम विभागात एक, तर सातपूर विभागात दोन व सिडको विभागात तीन ठेकेदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. नोटिशीमध्ये तातडीने रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी महापालिका मात्र स्वखर्चाने रस्ते दुरुस्त करत असल्याने या गोंधळाचा ठेकेदारांना पाठीशी घातले जात तर नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: World Breastfeeding Week : जन्मानंतर एक तासाच्या आत स्‍तनपान बाळासाठी अमृत

Web Title: Temporary Bandage Of Action By Pwd Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..