TET Exam
sakal
नाशिक: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत येत्या २३ नोव्हेंबरला होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) जिल्ह्यातील ३२ हजार ३१ परीक्षार्थी प्रविष्ट होणार आहेत. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर ‘एआय’चा वापर करून नियंत्रण कक्षात प्रेक्षपित होईल. कार्यरत शिक्षकांनाही ‘टीईटी’ उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्यामुळे यंदा परीक्षार्थींची संख्या वाढली आहे.