TET students
esakal
इगतपुरी - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा-टीईटी) २०२६ साठी उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यंदा तब्बल सहा लाख १२५ उमेदवारांनी नोंदणी केली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या एक लाख २४ हजार ४५६ ने अधिक आहे. सर्वोच्च न्यायालयाने टीईटी परीक्षा अनिवार्य केल्याने सेवेत असलेले शिक्षक तसेच शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केल्याचे दिसून येत आहे.