TET Exam
sakal
नाशिक: शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) रविवारी शहरातील सीडीओ मेरी परीक्षा केंद्रावर पहिल्या सत्रातील प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांमधे गोंधळ झाल्यावर शिक्षण विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे केंद्र संचालकांनी या संदर्भात शिक्षण विभागाला कुठलीही माहिती न दिल्याने वृत्तपत्रातील बातम्यांच्या आधारे शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून अहवाल मागविला असून, अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.