TET Exam
sakal
नाशिक: इंग्रजी माध्यमाच्या परीक्षार्थींना मराठी माध्यमाची प्रश्नपत्रिका अन् इंग्रजी माध्यमाची उत्तरपत्रिका (ओएमआर शीट); तर मराठी माध्यमाच्या परीक्षार्थींना इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका अन् मराठी माध्यमाची उत्तरपत्रिका (ओएमआर शीट)... शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) रविवारी (ता. २३) असा धक्कादायक प्रकार सीडीओ मेरी केंद्रावर उघडकीस आला. परीक्षा सुरू होताच विद्यार्थ्यांनी चूक लक्षात आणून दिल्यावरही वेळेत समस्येवर तोडगा न काढल्याने परीक्षार्थींचे भवितव्य टांगणीला लागले आहे.