TET Result: हौसे- नवसे परीक्षार्थींमुळे टीईटीच्या निकालाचे वाजताय बारा! यंदा निकाल साडेतीन टक्के

TET exam news
TET exam newsesakal

येवला (जि. नाशिक) : भावी गुरुजींसाठी महत्त्वाचा टप्पा असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) यंदा साडेतीन टक्के निकाल लागला. उत्तीर्णतेची संख्या वाढली असली, तरी टक्का मात्र घटला आहे. दोन्ही पेपरसाठी दरवर्षी चार लाखाच्या आसपास उमेदवार परीक्षेला बसतात.

मात्र उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या पंधरा हजाराच्या आसपास राहते. नियमित काम व खासगी नोकरी करून कुठलाही सराव आणि तयारी न करता टीईटी परीक्षा देत असल्याचे वास्तव पुढे आले. त्यामुळे निकालाचा टक्का घटत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (TET exam Result year result three half percent Increase number of people taking exams without studying nashik news)

पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. कोरोनाचे दोन वर्षातील सावट निवळल्यानंतर २१ नोव्हेंबर २०२१ ला परीक्षा घेण्यात आली. याच दरम्यान टीईटी परीक्षेतील घोटाळा उघडकीस आला. त्याची चौकशी सुरू झाली. त्यामुळे नोव्हेंबर २०२१ मधील परीक्षेचा निकाल लांबला.

अखेर गेल्या शुक्रवारी परीक्षा परिषदेकडून निकाल जाहीर झाला. गेल्या काही परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आल्याने यावेळी निकोपपणे निकाल लागला असल्याचे सांगितले जाते. अर्थात, त्याचा निकालावर विशेष परिणाम झालेला दिसत नसला, तरी या निकालात गैरप्रकार नसल्याचा दावा केला जात आहे.

TET exam news
Dhule Crime News: वि‍श्‍वस्तासह कामाठीवर गुन्हा दाखल; आदिवासी सेवा मंडळ संस्थेच्या फसवणुकीचे प्रकरण

तयारी नसल्यावर उत्तीर्ण कसे होणार?

परीक्षेत पहिली ते पाचवी गटाच्या पेपर एकसाठी दोन लाख १६ हजार ५७९ परीक्षार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ९ हजार ६५३ विद्यार्थी पात्र झाल्याने केवळ ३.७९ टक्के निकाल लागला. सहावी ते आठवीच्या पेपर दोनसाठी एक लाख ८५ हजार ४३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी सात हजार ६३४ म्हणजेच ३.५६ टक्के विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

मुळातच, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेपेक्षा हा निकाल कडक लागल्याचे दिसते. २००६ पासून शिक्षक भरती झालेली नसल्याने व नोकरीची खात्री असल्याने अनेक तरुणांनी आपला मार्ग बदलून घेत खासगी नोकरी स्वीकारली. शिवाय टीईटीची परीक्षा देणारे बोटावर मोजण्या इतके उमेदवार अभ्यास करून परीक्षेला येतात.

परीक्षेची काठिण्य पातळी अधिक असल्याने थोड्याफार अभ्यासावर यश हुलकावणी देत असल्याचे वास्तव आहे. तसेच पूर्वी डीएड व बीएडसाठी ६५ ते ७० टक्क्यांच्या पुढील विद्यार्थ्यांना संधी मिळायची.

आता जागा भरत नसल्याने डीएड व बीएडला पाहिजे त्याला प्रवेश हे तत्त्व दिसत असून परिणामी गुणवत्ता नसून विद्यार्थी पुढे जातात. म्हणूनच टीईटीच्या निकालावर परिणाम होत असल्याचे जाणकार सांगतात.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

TET exam news
Jindal Fire Accident: जिंदाल अग्नितांडवातील ढिगाऱ्याखाली एक मृतदेह आढळला! अजूनही 83 कामगार बेपत्ता

टीईटीचा आजवरचा निकाल (आकडेवारी उत्तीर्णांची आहे)

वर्ष पेपर १ पेपर २ एकूण

२०१४ २ हजार ५६३ ७ हजार ३२ ९ हजार ५९५

२०१५ १ हजार ९०३ ७ हजार ८६ ८ हजार ९८९

२०१७ ७ हजार ४४५ २ हजार ९२८ १० हजार ३७३

२०१८ ४ हजार ३० ५ हजार ६४७ ९ हजार ६७७

२०१९ १० हजार ४८७ ६ हजार १०५ १६ हजार ५९२

२०२१ ९ हजार ६७४ ७ हजार ६४७ १७ हजार ३२२

"वाचनसंस्कृती कमी झाली. रेडीमेड नोट्स लागतात. अवांतर वाचन कमी होतेय. पालक मुलांवर अपेक्षाचे ओझे टाकतात. काहीजण परीक्षा द्यायची म्हणून देतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने निकाल घटतोय. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण, बौद्धिक, स्पर्धात्मक विकासाठी ताणतणाव विरहित राहण्यासाठी सरकारने आठवी ते दहावी पर्यंत मानसशास्त्र या विषयाचा समावेश शालेयस्तरापासून केला पाहिजे. विद्यार्थ्यांचा मानसिक विकास होऊन त्यांच्यात स्व-जाणीव निर्माण होईल व शालेयस्तर ते स्पर्धा परीक्षेत निकाल उंचावेल." - डी. आर. नारायणे, कार्यवाह, माध्यमिक शिक्षक संघ

"शिक्षक भरती २००५ पासून झालेली नसल्यामुळे उमेदवार अद्याप नोकरीपासून वंचित आहेत. नोकरी मिळेल या अपेक्षेने परीक्षेची जाहिरात निघाली की अर्ज करतात व परीक्षा देतात. अनेकांचा अभ्यासक्रमाशी संपर्क नसल्यामुळे तसेच अनेकजण नोकरी व्यवसायात गुंतल्यामुळे अभ्यासाविना परीक्षा देतात. परीक्षेची काठिण्य पातळी अधिक आहे. नोकरीची हमी नसल्यामुळे गुणवत्ताधारक उमेदवार या अभ्यासक्रमाकडे जात नाही. अशा विविध कारणांमुळे टीईटीचा निकाल घटक आहे. पण टीईटीमधील अनुत्तीर्ण उमेदवार स्पर्धा परीक्षांमधून अधिकारी झालेत."

- बाजीराव सोनवणे, खजिनदार, प्राथमिक शिक्षक संघ

TET exam news
Jindal Accident: जिंदालमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देत घेतला मागोवा; 724 कामगार सुरक्षिततेचा दावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com