Thackeray Group: ठाकरे गटाच्या ‘यंग ब्रिगेड’ची BJPच्या गडात चुणूक! युवकांना संधी मिळताच संचारला उत्साह

Uddhav Thackeray Group
Uddhav Thackeray Groupesakal

Thackeray Group : गेल्या अनेक वर्षांपासून अपवाद वगळता भाजपचा गड असलेल्या पाथर्डी ते नासर्डी भागाला भेदण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने युवकांना पदाधिकारी म्हणून जबाबदाऱ्या दिल्या आहेत.

या ‘यंग ब्रिगेड’ने चुणूक दाखविणे सुरू केल्याने भविष्यात भाजपचा हा तथाकथित बालेकिल्ला भेदला जाणार की अभेद्य राहणार, हे बघणे रंजक ठरणार आहे. (Thackeray group young brigade in stronghold of BJP youth get opportunity nashik political news)

ठाकरे सेनेतर्फे नुकत्याच जाहीर केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत माजी महानगर प्रमुख देवानंद बिरारी यांना उपजिल्हाप्रमुख पद मिळाले. तर, नाशिक मध्य विधानसभेचा विचार करता संजय गायकर यांना विधानसभा समन्वयक व ऋषी वर्मा यांना विधानसभा संघटकपदाची जबाबदारी दिली आहे.

राजू थेटे आणि आतिश जाधव विभाग प्रमुख आहेत. तर प्रवीण जाधव, कैलास जाधव, वसीम सय्यद हे उपविभाग प्रमुख आहेत. सरप्रितसिंग बल यांच्याकडे उपमहानगर प्रमुखपद, तर दत्ता दंडगव्हाळ उपमहानगर समन्वयक आहेत. पंकज कराडे विभाग संघटक आणि राहुल बाबर आदी प्रभाग प्रमुख आहेत.

सिडको विभागात मोडणाऱ्या पाथर्डी परिसरात शिवसेनेचे सुदाम डेमसे आणि संगीता जाधव हे दोन नगरसेवक होते. मात्र, या दोघांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेना आता सैरभैर होते की काय अशी वेळ आली होती.

मात्र दुसऱ्या फळीत काम करणाऱ्या निलेश साळुंखे यांना उपमहानगर प्रमुख, रवींद्र गामणे आणि बंडू दळवी विभागप्रमुख, दादा मेढे विभाग संघटक, दीपक केदार, विक्रम शिरसाट, संदेश एकमोडे, महेश चव्हाण सर्व विभाग समन्वयक, तर मदन डेमसे, सागर देशमुख आणि आकाश कदम यांच्यावर उपविभाग प्रमुखपदासह आदींना जबाबदारी देण्यात आली आहे.

सोबत युवा सेना उपजिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट आणि त्र्यंबक कोंबडे हे पाथर्डीकर सोबत आहेतच. पूर्वीपासूनच पक्षात सक्रिय असलेल्या या युवकांमधूनच नवीन पदाधिकारी दिल्याने या सर्वांचा उत्साह कमालीचा वाढला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Uddhav Thackeray Group
Maharashtra Politics : 'मच्छर मारण्यासाठी धमकी देण्याची गरज नाही'; भाजप नेत्याचं वक्तव्य

प्रभाग ३१मध्ये नुकत्याच झालेल्या जन आक्रोश आंदोलनाद्वारे या सर्वांनी आपला दम खम दाखवून दिला आहे. हे सर्व युवक शिवसेनेच्या विविध उपक्रमांत आणि आंदोलनांत वरिष्ठांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते.

आता स्वतःच पदाधिकारी झाल्याने डबल उर्जेने ही यंग ब्रिगेड पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी सरसावली आहे. त्यासाठी प्रत्येक जण आपले वैयक्तिक संबंध, स्वतःची मंडळे, इतर पक्षातील मित्रपरिवार आणि नात्यागोत्याचा उपयोग करत आहेत.

स्वतःचा प्रभाग एवढेच कार्यक्षेत्र मर्यादित न ठेवता या संपूर्ण बेल्टमध्ये संघटना म्हणून पुढे येण्यासाठी काय करावे लागेल, याबाबत युवकांच्या अंगाने ही मंडळी मंथन करत आहे. ज्येष्ठ नेते बबन घोलप, उपनेते सुनील बागुल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गीते, विनायक पांडे हे देखील मार्गदर्शन करत आहेत.

आव्हान आहेच, पण...

आमदार देवयानी फरांदे व सीमा हिरे, माजी महापौर सतीश कुलकर्णी, माजी सभागृह नेता सतीश सोनवणे, माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे, सुनील खोडे, डॉ. दिपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे, ॲड. शाम बडोदे, भगवान दोंदे, पुष्पा आव्हाड, यशवंत निकुळे, रूपाली निकुळे, शाहीन मिर्झा या भाजपच्या दिग्गज मंडळीसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोठ्या ताकदीसमोर संघटना मजबूत करण्याचे आव्हान या सर्वांसमोर आहे.

असे असले तरी कुणीही कायम अजिंक्य नसतो. प्रत्येकाला हरवले जाऊ शकते, हा आत्मविश्‍वास घेऊन आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे काम सुरू केले आहे आणि त्यात यश नक्की मिळेल असा विश्‍वास ही यंग ब्रिगेड व्यक्त करताना दिसत आहे.

Uddhav Thackeray Group
Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणातून मोठी अपडेट; विधीमंडळाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com