Nashik Thakkar Bazaar : स्वच्छतागृह 'लक्झरी' बनले! ठक्कर बझार बसस्थानकात नैसर्गिक विधीसाठी तब्बल ५ रुपये शुल्क; प्रवाशांमध्ये संताप
Passengers Question MSRTC’s Transparency : नाशिक येथील ठक्कर बझार बसस्थानकातील वादाचे कारण ठरलेले स्वच्छतागृह. या ठिकाणी प्रवाशांकडून नैसर्गिक विधीसाठी आकारले जाणारे ५ रुपये शुल्क आणि त्याबद्दल असलेला प्रवाशांचा संताप.
नाशिक: नाशिककरांनो, आता नैसर्गिक विधीसाठी जाणंही लक्झरी ठरतंय! ठक्कर बझार बसस्थानकातील स्वच्छतागृहात जाण्यासाठी तब्बल पाच रुपये आकारले जात असल्याने प्रवाशांमध्ये संताप उसळला आहे.