नाशिक- नाशिक दौऱ्यावर आलेल्या एका राजकीय पक्षाच्या नेत्याने अनौपचारिक गप्पांदरम्यान राज्यातील काही राजकीय नेते आणि उच्चपदस्थ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकले असल्याचा उल्लेख केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ठाणे आणि नाशिक येथे तक्रारी दाखल असल्याची चर्चा सुरू असली तरी, नाशिक आयुक्तालय हद्दीतील कोणत्याही पोलिस ठाण्यात अशी तक्रार दाखल झालेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.