कलाविष्कारांनी ‘अनंत तरंग’चा समारोप | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालकमंत्री भुजबळ यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

नाशिक : कलाविष्कारांनी ‘अनंत तरंग’चा समारोप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गोवर्धन येथील एमईटी स्‍कूल ऑफ आर्किटेक्‍चर ॲण्ड इंटेरियर डिझाईन येथे सुरू असलेल्‍या ‘अनंत तरंग’ वार्षिक प्रदर्शनाचा शनिवारी (ता.२०) समारोप झाला. विद्यार्थ्यांनी विविध कलांचा आविष्कार सादर करताना लक्ष वेधले. दरम्‍यान, तिसऱ्या दिवशी एमईटीचे संस्‍थापक अध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भेट देताना विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

प्रदर्शनाला भेट देताना श्री. भुजबळ यांनी प्रकल्‍पांची पाहणी केली, तसेच विद्यार्थ्यांना त्‍यांनी केलेल्‍या कार्याबद्दल कौतुकाची थाप दिली. संस्‍थेचे अध्यक्ष विश्वस्त समीर भुजबळ यांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्‍साहित केले. लीवर्डदिस्ट्स या कार्यक्रमातून वास्तुविशारद अर्जुन काळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सीईपीटीमधून अर्बन डिझाईनमध्ये मास्टर्स केले असून, लीवर्डदिस्ट्स नावाचा विलक्षण कॉमिक ब्रँड साकारला आहे.

हेही वाचा: उद्दिष्टे येऊन पडली तरीही प्राधान्यक्रम याद्याच तयार नाहीत

लीवर्डदिस्ट्स हे कॉमिक्सच्या माध्यमातून डिझाइन, आर्किटेक्चर, शाश्‍वतता आणि अर्बन डिझाइनचे महत्त्व जाणून घेण्यासाठी व्यासपीठ आहे. लीवर्डदिस्ट्स ही विचार प्रवृत्त करणारे वास्तुशिल्प सामग्री असून, जीवन अनुभव आणि कथा या सर्व कॉमिक माध्यमातून कथन केल्या आहेत. सध्याच्या युगातील वयोगटातील गुंतागुंतीच्या समस्या दुसऱ्यापर्यंत पोचविण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे, असे त्यांनी सांगितले. समारोपप्रसंगी शोधप्रबंध सादरीकरण (थिसीस सिम्पोसियम), सुलेखन स्‍पर्धा (कॅरीकेचर कॉम्पिटिशन) यांसह पारितोषिक वितरण, विद्यार्थी स्‍नेहसंमेलन पार पडले.

loading image
go to top