esakal | रेमडेसिव्‍हिरची मागणी लवकरच पोर्टलद्वारे नोंदविण्याची सुविधा; सुलभ होणार प्रक्रिया

बोलून बातमी शोधा

remdecivir nsk.jpg

रेमडेसिव्‍हिरची मागणी लवकरच पोर्टलद्वारे नोंदविण्याची सुविधा; सुलभ होणार प्रक्रिया

sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : रेमडेसिव्‍हिर इंजेक्‍शन थेट कोविड रुग्‍णालयांना पोच करण्याचा निर्णय घेतल्‍यानंतर या प्रणालीत अधिकाधिक सुलभता आणली जात आहे. याचाच एक भाग म्‍हणून रुग्‍णालयांकरिता पोर्टल विकसित करण्याची तयारी सुरू असून, याद्वारे रुग्‍णालयांना रेमडेसिव्‍हिरची मागणी नोंदविता येणार आहे.

नोंदणीला आता विलंब होणार नाही

मंगळवारी (ता. २०) उपजिल्‍हाधिकारी नीलेश श्रींगी यांच्‍यासोबत इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस, माजी अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध भांडारकर, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. नीलेश कुंभारे यांची बैठक झाली. या वेळी यासंदर्भात चर्चा झाली. सध्या रुग्‍णालयांना ई-मेलद्वारे मागणी नोंदवावी लागत आहे. परंतु या ई-मेलवर सामान्य नागरिकांकडून वैयक्‍तिक स्‍वरूपात मागणीचे ई-मेल प्राप्त होऊ लागल्‍याने यंत्रणेचा बराच वेळ वाया जातो. अशात पर्यायी विकल्‍पांवर चर्चा झाली. यात ई-मेल पाठविण्याऐवजी अन्‍य पर्यायाचा अवलंब करण्याचे निश्‍चित केले. त्‍यानुसार जिल्‍हा प्रशासनामार्फत पोर्टल विकसित केले जाईल. त्‍याद्वारे हॉस्‍पिटल थेट स्‍वतःची मागणी नोंदवू शकतील.