esakal | डाळिंबावर रोगांची संक्रांत; संतापात शेतकऱ्याकडून संपूर्ण बागच उध्वस्त
sakal

बोलून बातमी शोधा

The-farmer-removed-the-entire-pomegranate-orchard-nashik-agriculture-news

डाळिंबावर रोगांची संक्रांत; निसर्गापुढे शेतकरी हतबल

sakal_logo
By
राकेश शिरोडे

ब्राह्मणगाव (जि. नाशिक) : वातावरणातील नैसर्गिक बदलामुळे डाळिंब बागेवर तेल्या, मर रोगाच्या प्रादुर्भाव मूळे तर गेल्या चार-पाच वर्षांपासून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, व अन्य नैसर्गिक संकटांना शेतकरी वर्ग कंटाळला असून सततच्या या आपत्तींना कंटाळून येथील डाळिंब उत्पादक व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव दोधू अहिरे यांनी शेतात लागवड केलेली डाळिंब बाग जेसीबीच्या साहाय्याने बुडासकट काढून टाकली. (The-farmer-removed-the-entire-pomegranate-orchard-nashik-agriculture-news)

शेतकरी निसर्गापुढे हतबल

नैसर्गिक आपत्ती बरोबर सततच्या अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे डाळिंब फळ पिकावर मोठी अवकळा आली असून त्यामुळे बऱ्याच द्राक्ष व डाळिंब बाग कुऱ्हाडीने बुडासकट तोडून टाकल्या जात आहेत. यामुळे परिसरातील डाळिंब, द्राक्ष बागाची संख्या मोठ्या प्रमाणात घटू लागल्या असून शेतकरी निसर्गापुढे हतबल झाला आहे. खरे पाहता फळबागांनीच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली होती.

हेही वाचा: बांधकाम व्यावसायिक ते आदर्श गोपालक!

नैसर्गिक संकटांमुळे नेमके कोणते पीक घ्यावे?

गेल्या चार-पाच वर्षांपासून शेती व्यवसायावर नैसर्गिक संकटांना शेतकऱ्यांना सारखे तोंड द्यावे लागत आहे. तरीही शेतकरी मोठी आर्थिक झळ सोसत शेती व्यवसाय करत आहे. मात्र सध्या नैसर्गिक वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस, अती ऊन, त्यातच पिकांवरील महागडी औषधे, वाढती शेतमजुरी, पिकांना उत्पन्नापेक्षा कमी मिळणारा बाजारभाव, यात होणारे सर्व नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच याआधी येथील डाळिंब उत्पादक जेष्ठ नेते राघो नाना अहिरे, रमेश अहिरे, चंद्रकांत अहिरे, योगेश अहिरे यांनीही डाळिंब बाग व द्राक्ष बाग जेसीबीच्या सहाय्याने बुडासकट तोडून टाकल्या आहेत.
सध्यातर सर्वच पिकांना नैसर्गिक संकटांचा त्रास वाढला असून या नैसर्गिक संकटांना तोंड देत असलो तरी नेमके कोणते पीक घ्यावे या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत.

(The-farmer-removed-the-entire-pomegranate-orchard-nashik-agriculture-news)

हेही वाचा: निफाडमध्ये वन विभागाच्या एकाच पिंजऱ्यात दोन बिबटे जेरबंद

loading image