esakal | निफाडमध्ये वन विभागाच्या एकाच पिंजऱ्यात दोन बिबटे जेरबंद
sakal

बोलून बातमी शोधा

leopards

निफाडमध्ये वन विभागाच्या एकाच पिंजऱ्यात दोन बिबटे जेरबंद

sakal_logo
By
मुकुंद भडांगे

कोकणगाव (जि. नाशिक) : निफाड तालुक्यातील वडाळी (नजीक) येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात दोन बिबटे रविवारी (दि.११) मध्यरात्री जेरबंद झाले आहे. याबाबत शेतकरी रोहन होळकर यांनी माहिती दिली. (Two-leopards-were-trapped-in-the-Forest-Department-cage-Nashik-marathi-news)

भीतीने शेतीचे कामे बंद

गेल्या चार ते पाच महिन्या पासून वडाळी नजीक शिवारात बिबट्या चा मोठया प्रमाणात वावर आहे. आठ ते दहा दिवसांपुर्वी रोहन होळकर यांच्या घरातील माणसे शेती कामासाठी गेली होती. बिबट्यांनी त्यांच्या मागे धावत पाठलाग केला होता, त्यामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली. सदर घटनेची माहीती रोहन होळकर यांनी वन विभागाला यांना कळवली. माहीतीच्या आधारे वन विभागाने चार दिवसांपूर्वी होळकर यांच्या उसाच्या शेतात पिंजरा लावला असता, एकाच वेळी दोन बिबटे या पिंजऱ्यात जेरबंद झाले.

''गेल्या काही महिन्यांपासून वडाळी नजीक परीसरात तसेच आमच्या उसाच्या परिसरात बिबट्यांचा वावर वाढलेला आहे. शेती काम करायला गेले असता बिबट्या चाल करून येत असल्याने शेतीचे कामे बंद पडली आहेत. उसाचे बेणे तोडणे थांबले आहे. या पकडलेल्या बिबट्या व्यतिरिक्त अजूनही काही बिबटे असण्याची शक्यता आहे.'' - रोहन होळकर, शेतकरी

(Two-leopards-were-trapped-in-the-Forest-Department-cage-Nashik-marathi-news)

हेही वाचा: कांदा चाळींवर यूरियाचे संकट! विकृतपणामुळे शेतकऱ्यांनी घेतला धसका

loading image