नाशिक- तपोवन परिसरातील लॉन्समधून सुरू असलेल्या लग्नसोहळ्यातून महिलेची पर्स चोरट्याने हातोहात लंपास करीत सुमारे एक लाख ३५ हजारांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे अडीच लाखांच्या ऐवजावर चोरट्याने डल्ला मारला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक मुलगा पर्स पळविल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. लता नामदेव जायभावे (५०, रा. जाचकनगर, जय भवानी रोड) यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता.१) रात्री गोरज मुहूर्तावर तपोवनातील एका लॉन्समध्ये विवाह सोहळा होता.