Nashik Crime News : कळवणमध्ये दिवसा 7 लाखाची धाडसी चोरी

Bapusaheb Khairnar's materials left in a mess after theft in his house.
Bapusaheb Khairnar's materials left in a mess after theft in his house.esakal

कळवण (जि. नाशिक) : शहरातील कुलस्वामिनी कॉलनीत सकाळी अकरा ते एकदरम्यान कुलूपबंद लोखंडी दरवाजा तोडून घरात प्रवेश करीत अज्ञात चोरट्यांनी तब्बल सात लाखाची धाडसी चोरी करून सोन्यासह रोख रकमेवर डल्ला मारला. या प्रकरणी कुलस्वामिनी कॉलनीतील जिल्हा बँकेचे निवृत्त कर्मचारी बापूसाहेब खैरनार यांनी फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान अभोणा येथील चोरीच्या घटनेनंतर कळवणमध्ये धाडसी चोरी झाल्याची घटना घडली. (theft of 7 lakhs on daytime in Kalwan Nashik Latest Crime News)

First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

Bapusaheb Khairnar's materials left in a mess after theft in his house.
Nashik Crime News : कर्डेल खुनाचा सख्खा पुतण्याच Master Mind!; अल्पवयीन मुलासह दोघांना अटक

बापूसाहेब खैरनार मानूर येथे दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. पत्नी शिक्षिका असल्याने पाळे येथे शाळेत गेल्या होत्या. तर मुलगा मानूर येथील कॉलेजला गेला होता. दुपारी बापूसाहेब खैरनार घरी परतले असता त्यांना लोखंडी दरवाजा बंद आणि घराचा प्रवेशद्वाराचा लाकडी दरवाजा अर्धवट उघडा दिसून आला. घरातील लोखंडी कपाट उघड्या स्थितीत दिसून आले. कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले असल्यामुळे चोरी झाल्याचे लक्षात आले.

सोन्याचा गळ्यातील गोप, पोहेहार, सोन्याचा कॉइन, अंगठ्या, कानातले झुबे, सोन्याचे मणी, चांदीचे झुबे, चांदीच्या साखळ्या आदी वस्तू चोरीस गेल्या आहेत. कळवण पोलिस स्टेशन निरीक्षक समाधान नागरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नाशिक येथून श्वान पथक व हाताचे ठसे घेणाऱ्या पथकाला पाचारण केले.

Bapusaheb Khairnar's materials left in a mess after theft in his house.
Nashik Crime News : घरफोड्या 2; गुन्हा मात्र एकच! : पोलिसांची अजब शक्कल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com