Nashik Crime News: कारच्या सायलेन्सरवर चोरट्यांचा डोळा; विशिष्ठ धातूसाठी होतेय चोरी

Theft of car silencer increasing nashik crime news
Theft of car silencer increasing nashik crime news

Nashik Crime News : नाशिकरोड परिसरातील जय भवानी रोडवरील जाचकनगरमध्ये पार्क केलेल्या मारुती कारचे सायलेन्सर चोरट्यांनी चोरून नेले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये चारचाकी वाहनांचे सायलेन्सर चोरीचे प्रकार सातत्याने घडत आहेत.

यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे, सायलेन्सरच्या आतमध्ये असला धातू काढून तो खुल्या बाजारात विकल्याने मोठी किमत चोरट्यांना मिळत असल्याचे बोलले जाते. (Theft of car silencer increasing nashik crime news)

चारचाकी वाहनांची सायलेन्सर चोरीला जाण्याचे प्रकार अलिकडे वाढले आहेत. विशाल धनाजी मोरे (रा. साईदिशा अपार्टमेंट, जाचकनगर, जय भवानी रोड, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या गुरुवारी (ता.७) मध्यरात्री त्यांची मारुती इको कार (एमएच १५ जीएल ५९४५) पार्किंगमध्ये पार्क केलेली असताना, अज्ञात चोरट्यांनी या कारचे २५ हजार रुपयांचा सायलेन्सरच चोरून नेले आहे.

याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरातून विशिष्ठ कंपनीच्या चारचाकी कारचे सायलेन्सर चोरीला जाण्याचे प्रकार घडलेले आहेत. यामागे त्या सायलेन्सरमधील एका विशिष्ठ धातू कारणीभूत असल्याचे बोलले जाते. यासाठीच कारचे सायलेन्सर चोरी करणारी टोळी कार्यरत आहे. पुण्या, मुंबईसह देशभरातील मोठया शहरांमध्ये अशा सायलेन्सर चोरणाऱ्या टोळ्यांमुळे कारमालकांसह पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे.

Theft of car silencer increasing nashik crime news
Nashik Crime News: कर्जाचा एक हप्ता थकल्याने कामगाराला भररस्त्यात मारहाण

सायलेन्सरमध्ये असतो ‘हा’ धातू

विशिष्ठ कंपनीच्या चारचाकी कारच्या सायलेन्सरमध्ये असलेल्या पोकळीतून धूर बाहेर पडतो. हा धूर बाहेर पडत असताना सायलेन्सरच्या पोकळीमध्ये या धूरासोबतच काही विशिष्ठ धातूचे कणही बाहेर पडतात. परंतु ते धुरासमवेत बाहेर न पडता सायलेन्सरमध्येच अडकतात. हे अडकलेले धातूचे कण धूळमिश्रित मातीत असतात. या धूळमिश्रित मातीत आढळणारा धातू प्लॅटिनम सदृश्य धातू असून त्यास मोठी मागणी आहे.

त्यासाठी चोरटे एका विशिष्ठ कंपनीच्या कारला लक्ष्य करीत त्या कारचे सायलेन्सर चोरतात. त्यातील धूळमिश्रित माती काढून ती ‘ब्लॅक मार्केट’मध्ये विकतात. या मातीला चांगली मागणी असून, त्यास चांगली किंमत मिळत असल्याने चोरट्यांकडून त्याच कार लक्ष्य केल्या जात आहेत.

Theft of car silencer increasing nashik crime news
Nashik Crime News: चैनस्नॅचिंग करणारा पोलीस सेवेतून बडतर्फ; आयुक्तांचा दणका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com