Nashik Crime: चोरीच्या दुचाकीवरून विज पंपाची चोरी; विधी संघर्षित बालकासह मुख्य संशयित पोलिसांच्या जाळ्यात

सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळे गावच्या शिवारात शेतातील विज पंप चोरून नेणाऱ्या दोघांना पोलिसांनी चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले.
crime
crimeesakal

वावी : सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळे गावच्या शिवारात शेतातील विज पंप चोरून नेणाऱ्या दोघांना पोलिसांनी चोरीच्या दुचाकी सह ताब्यात घेतले.

यात एका विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे. (Theft of power pump from stolen bike main suspect along with minor child caught by sinnar police nashik crime)

crime
Navi Mumbai Crime : मराठा आरक्षणाच्या मोर्चात चोरट्यांनी केली हात की सफाई; 18 तोळे सोन्याचे दागिने 3 मोबाईल लंपास

पिंपळे येथील शेतकरी मारुती बंडू पानसरे यांच्या शेतातील विहिरीतील वीज पंप अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार 25 जानेवारीच्या सकाळी उघडकीस आला होता.

यासंदर्भात त्यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस नाईक एन.बी. गिते, हेमंत तांबडे, पोलिस शिपाई गौरव सानप यांनी तुषार कडभाने, सुयश शिंदे दोघे राहणार मनेगाव या पोलिस मित्रांच्या मदतीने हर्षद दत्तु सदगिर रा. डूबेरवाडी व एका विधी संघर्षित बालकास ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून विना क्रमांकाची चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली. तसेच पिंपळे येथून चोरलेली कंपनीची जलपरी मोटार देखील जप्त करण्यात आली.

crime
Crime News: घराबाहेर खेळणाऱ्या निष्पाप मुलाला रस्त्यावर आपटून मारले, क्रूरता पाहून लोकं हादरले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com