esakal | नाशिककरांसाठी धरणात पुरेसे पाणी; पाणीसाठा 42 वरून 48 टक्के

बोलून बातमी शोधा

Dam
VIDEO : नाशिककरांसाठी धरणात पुरेसे पाणी; पाणीसाठा 42 वरून 48 टक्के
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणी साठा गेल्या आठवड्यात 42 टक्‍क्‍यांवर खाली गेला होता. परंतु कश्यपी धरणातील सोडलेले पाणी गेले आठ दिवसापासून गंगापूर धरणात येत असल्याने पाणी साठ्यात वाढ झालेली आहे. पाणी साठा 48 टक्‍क्‍यांवर गेलेला आहे. या वर्षीच्या उन्हाळ्यात नाशिककरांना पिण्याच्या पाणी पुरेसे आहे. किंबहुना गेल्या वर्षीपेक्षा यंदाची स्थिती चांगली आहे.

दर दिवशी नाशिककर साधारणपणे 13 ते 14 दशलक्ष घनफूट पाणी वापरतात. सद्या गंगापूर धरणामध्ये 2709 दशलक्ष्य घनफूट साठा आहे. शिवाय 792 दशलक्ष घनफूट कश्यपी धरणात आहे. गौतमी धरणामध्ये 308 दशलक्ष घनफूट साठा आहे. गेल्या वर्षीपेक्षा या उन्हाळ्यात पाण्याची स्थिती उत्तम राहणार आहे. कक्ष्यपी व गौतमी चे पाणी गंगापूर धरणात आल्या नंतर साठा 52 ते 53 टकके राहील.

हेही वाचा: महामारी आजारांचा चारशे वर्षांचा इतिहास! सोशल मीडियावर संदर्भासह चित्र व वृत्त

गेल्यावर्षी 29 एप्रिल पाण्याची स्थिती

गंगापूर धरण 41. 21 टक्के

कश्यपी धरण 89.14 टक्के

गौतमी धरण 33.29 टक्के

हेही वाचा: गॅंगस्टर रवी पुजारी नाशिक न्यायालयात हजर; मोठा पोलीस बंदोबस्त

या वर्षी 29 एप्रिल पाण्याची स्थिती

गंगापूर धरण 48.11 टक्के

कश्यपी धरण 42.78 टक्के

गौतमी धरण 16.48 टक्के