esakal | महामारी आजारांचा चारशे वर्षांचा इतिहास! सोशल मीडियावर संदर्भासह चित्र व वृत्त

बोलून बातमी शोधा

pandemic
महामारी आजारांचा चारशे वर्षांचा इतिहास! सोशल मीडियावर संदर्भासह चित्र व वृत्त
sakal_logo
By
युनूस शेख

नाशिक : गेल्या चारशे वर्षांचा इतिहास लक्षात घेतला तर प्रत्येक शंभर वर्षाने जागतिक पातळीवर दुर्धर आजाराने हाहाकार माजविला आहे. त्यात कोटींच्या घरात नागरिक दगावले आहे. यंदा कोरोनारूपी आजाराने जगात थैमान घातले आहे. आतापर्यंत जगात कोटींमध्ये, तर देशात लाखात नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. १७२०, १८२०, १९२० त्यानंतर २०२० या अशा वर्षामध्ये नागरिकानी मृत्यूचे तांडव अनुभवला आहे. अशा आशयाचे चित्र आणि वृत्त सद्या सोशल मीडियावर प्रसारित होताना दिसत आहे.

हेही वाचा: मरायचे असेल तर अकराच्या आत! शहरात मृताचा शेवटचा प्रवासदेखील खडतर

चारशे वर्षांपासून परंपरा; सोशल मीडियावर संदर्भासह चित्र व वृत्त

जगात कोरोनाचे मोठे संकट घोंगावत आहे. आपला देशही त्यातून सुटला नाही. दैनंदिन मृत्यूचा आकडा वाढत आहे. अशा या महामारीस घेऊन अनेकांकडून विविध प्रकारचे तर्कविर्तक लावले जात आहे. प्रत्येक जण आपला विचार मांडत आहे. अशाच एका चर्चेतून कोरोना महामारीस घेऊन एक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे प्रत्येक शंभर वर्षांनंतर एकदा महामारी जगात थैमान घालत असते. त्यासाठी गेल्या चारशे वर्षांपासूनचा पुरावादेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आला आहे. यंदाचा कोरोनादेखील त्यातील एक पुरावा असल्याचे बोलले जात आहे. ज्याप्रमाणे सद्या नागरिकांना कोरोनापासून बचावसाठी मास्क वापरणे अनिवार्य केले आहे त्याचपद्धतीने त्या वेळेसही नागरिक मास्कचा वापर करत होते. लॉकडाउन लावण्यात आले होते. रुग्णांसाठी मोठ्या हॉलमध्ये तात्पूरते स्वरूपाते रुग्णालय साकारण्यात आले होते. इतकेच नाही, तर काही रुग्णाना क्वारंटाइनदेखील ठेवण्यात आल्याचे छायाचित्र प्रसारित झाले आहे. या सर्व गोष्टींचे पालन नागरिकांनी केल्याने त्यावेळच यंत्रणेस वेळीस महामारी आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले होते. सद्या परिस्थितीत देखील सरकार आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केल्यास देशही कोरोना विरुद्ध लढाई जिंकू शकले.

हेही वाचा: खाकी वर्दीत दिसली माणुसकी; रिक्षाचालकाच्या डोळ्यात तर पाणी आलेच शिवाय बघ्यांनाही गहिवरून आले

महामारी आजारांचा चारशे वर्षांचा इतिहास

चारशे वर्षांच्या इतिहास जगात थैमान घातलेला माहामारी आजारांपैकी प्रत्येक आजार विदेशातून आले असल्याची माहिती सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या वृत्तातून समोर येत आहे. १७२० प्लेग आजाराने जगात थैमान घातले होते. त्यात टप्प्याटप्प्याने देशात हजारांच्या संख्येत नागरिकांना आजाराची लागण होऊन मृत्यू झाला होता. त्यानंतर १८२० मध्ये कॉलरा आजार समोर आला. भारत, जपान, अरब देशांसह चीन अशा जगातील विविध देशांना कचाट्यात घेतले. १९२० काळात फ्लूची लागन जगातील विविध देशातील नागरिकांना झाली. खरे तर फ्लूची सुरवात १९१८ मध्ये झाली. १९२० मध्ये उग्र रूप धारण केले. सुमारे कोटींच्या संख्येत जगात या आजाराने नागरिकांचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते. सद्या २०२१ सुरू असून २०२० मध्ये चीन देशातून जगाच्या वेगवेगळ्या देशात कोरोनाचा प्रसार झाला. आजही देशात कोरोनाचे थैमान सुरूच असून, मृत्युदराचा आकडाही वाढला आहे.