नाशिक : सातपूर परिसरात उद्या पाणीपुरवठा बंद

water supply
water supplyesakal

नाशिक : सातपूर विभागातील पाणीपुरवठा विभागातील सिमेंट पाइपलाइनला काही भागात गळती सुरू आहे. यामुळे पाण्याची नासाडी होत आहे. संबंधित विभागामार्फत जलवाहिनी दुरुस्‍तीचे काम हाती घेतले जाणार असल्‍याचे गुरुवारी (ता. ७) सातपूर परिसरातील काही भागातील पाणीपुरवठा खंडित राहणार आहे.

यासंदर्भात जारी केलेल्‍या माहितीपत्रकात म्‍हटले आहे, की कार्बन नाका, मेघा इंडस्ट्रीज लगत तसेच मोतीवाला महाविद्यालय परिसर, ध्रुवनगर येथील पाइपलाइन दुरुस्‍ती केली जाणार असल्‍याने गुरुवारी सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच शुक्रवारी (ता. ८) सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. दरम्‍यान, प्रभाग क्रमांक सात नहुष जलकुंभ वितरण क्षेत्रातील परिसरातील नहुष सोसायटी परिसर, पूर्णवादनगर, दादोजी कोंडदेवनगर, अरिहंत नरसिंग होम परिसर, आकाशवाणी टॉवर परिसर, तिरुपती हाऊस परिसर, सहदेवनगर, सुयोजित गार्डन परिसर, अयाचितनगर, गीतांजली सोसायटी, पंपिंग स्टेशन, शांती निकेतन इत्यादी परिसरात पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे.

तसेच, प्रभाग क्रमांक आठ येथील बळवंतनगर जलकुंभ वितरण क्षेत्रातील परिसरातील बळवंतनगर, रामेश्वरनगर, सिरीन मेडोज, सोमेश्वर कॉलनी, आनंदनगर, खांदवेनगर, सदगुरूनगर, पाटील लॉन्स परिसर, आनंदवली व गाव परिसर, सावरकरनगर, शंकरनगर, शारदानगर, पाम स्प्रिंग, कल्याणीनगर, चैत्रांगण सोसायटी, मते नर्सरी रोड, नरसिंहनगर, पंचम सोसायटी, रामनगर, दातेनगर, अयोध्या कॉलनी, भगूरकर मळा आदी परिसरातील पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे.

water supply
तापमान घसरल्याने दिलासा मात्र खंडीत विजपुरवठ्यामुळे संताप

गणेशनगर जलकुंभ वितरण क्षेत्रातील परिसरातील गणेशनगर, कामगारनगर, गुलमोहर कॉलनी, काळेनगर, सुयोग कॉलनी, पाइपलाइन रोड परिसर, गुरुजी हॉस्पिटल मागील परिसर विवेकानंदनगर, निर्मला विहार आणि प्रभाग क्रमांक नऊमधील ध्रुवनगर, जलकुंभ वितरण क्षेत्रातील परिसरातील मोतीवाला महाविद्यालय परिसर, गुलमोहर कॉलनी परिसर, शिवशक्ती कॉलनी, तुकाराम क्रीडांगण परिसर व नवीन ध्रुवनगर परिसर आदी ठिकाणांसह प्रभाग क्रमांक बारामधील रामराज्य जलकुंभ वितरण क्षेत्रातील परिसरातील कल्पनानगर, मॉडेल कॉलनी, कृषीनगर परिसर, उदय कॉलनी, नेर्लीकर हॉस्पिटल, गंगापूर रोड स्वामी समर्थ मंदिर परिसर, डिसूझा कॉलनी, गंगापूर रोड परिसरातही पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे.

water supply
नवापूरला पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा; दालनात ठिय्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com