
सुदाम बिडकर
पारगाव : पारगाव ता. आंबेगाव येथील संतोष राजु गायकवाड हे आळेफाटा गावाच्या हद्दीत पुणे नाशिक महामार्गावर काल शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हॉटेल समोर कार उभी करून हॉटेल मध्ये जेवण करण्यासाठी गेले असता जेवण करून आल्यावर त्यांच्या लक्षात आले कि अज्ञात व्यक्तींनी कारच्या दरवाजाची काच फोडून आतील दोन कॅमेरे, तीन लेन्स , एक फ्लॅश असा एकूण सहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.