‘बंटी- बबली’ अखेर जाळ्यात; नाशिक पोलीसांना सापडले घबाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

thug couple

नाशिक : ‘बंटी- बबली’ पोलिसांच्या जाळ्यात; सापडले घबाड

नाशिक रोड : लुटमार, चोरी करणारे "बंटी- बबली'' जोडपं रिक्षामध्ये फिरत असल्याची माहिती नाशिक रोड (nashik road police) पोलिसांना समजताच त्यांनी सहकाऱ्यांना सांगून साध्या गणवेशात सापळा रचला होता...

नाशिक-त्र्यंबकेश्वर-नाशिक असा पाठलाग

चोरी करणारे बंटी- बबली रिक्षामध्ये फिरत असल्याची माहिती नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांना समजताच त्यांनी सहकाऱ्यांना सांगून साध्या गणवेशात सापळा रचला, परंतु ते मिळून आले नाही. मात्र, सदर रिक्षा ही त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शोध पथकाचे कर्मचाऱ्यांनी त्रंबकेश्वर गाठले व परिसरातील विविध ठिकाणी जाऊन ४८ रिक्षाचालकांची चौकशी केली. त्यानंतर संशयित रिक्षाचालकाचे नाव मनोज जोशी व पत्नी लक्ष्मी जोशी असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी सतत तीन दिवस त्र्यंबकेश्वर परिसरात ठिय्या मांडला. जोशी याचा शोध घेतला असता, तो टेलिफोन एक्स्चेंज (Telephone exchange) येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तो त्याची पत्नी लक्ष्मी नाशिक येथे गेले असल्याची माहिती मिळाली. त्या दोघांचाही फोटो प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी नाशिक गाठले. दोघांनाही रिक्षासह ताब्यात घेतले. त्यांनी नाशिक रोड परिसरातील काही घरांमध्ये व मंदिरांमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली. दोघेही पती-पत्नी रिक्षामध्ये येऊन घरफोडी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्या दोघांकडून दोन लाख ३४ हजार तीनशे रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला असून, यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल, चांदीचा मुकुट व रिक्षाचा समावेश आहे.

आयुक्त दीपक पांडे, उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे, निरीक्षक गणेश न्यायदे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक योगेश पाटील, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, राजेश साबळे, विशाल पाटील, अविनाश झुंजरे, विशाल कुंवर, महेंद्र जाधव, योगेश वाजे, समाधान वाजे यांनी ही कामगिरी केली.