Nashik Crime: चोरट्याने लांबविला जर्मन नागरिकाचा मोबाईल; काही तासात संशयितास अटक

Railway Security Force officers, employees while arresting mobile phone thief of a foreigner
Railway Security Force officers, employees while arresting mobile phone thief of a foreigneresakal
Updated on

Nashik Crime : एकदा का मोबाईल चोरीला गेला की तक्रार दाखल केल्यानंतर तो लगेचच परत मिळेल याची कोणतीच शाश्‍वती नसतो.

मात्र मनमाड येथील रेल्वे पोलिसांनी तक्रार मिळताच समयसूचकता दाखवीत एका जर्मन नागरिकाचा मोबाईल अवघ्या काही तासात संशयितास सापळा रचून त्यास पकडत मिळवून दिला.

भारतात संपर्कासाठी महत्त्वाचा असलेला आपला किमती मोबाईल परत मिळाल्याने या जर्मन प्रवाशाने पोलिसांचे आभार मानले आहे. (thief stole mobile phone of German citizen suspect arrested within few hours Nashik Crime)

जर्मनीच्या बर्लिन येथे राहणारे फिलिप निनो (वय ३९) हे विदेशी गृहस्थ कामानिमित्त भारतात आले होते. वास्को द गामा - हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेसच्या एच -१ या बोगीतून प्रवास करत असताना त्याच्या हातात असलेला आयफोन मनमाड रेल्वे स्थानकाच्या दरम्यान चोरीला गेला.

या विदेशी व्यक्तीचा हा अनुभव अगदी संतापजनक होता. कारण जर्मनीतील नातेवाईक अथवा भारतात कामानिमित्त असलेल्या ओळखीच्या व्यक्तींचे फोन नंबर त्यात होते.त्यामुळे हा मोबाईल त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता.

मात्र विदेशी व्यक्तीचा मोबाईल चोरीला गेल्याची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी विशितील लांब केस आणि सडपातळ बांधा असलेल्या तरुणाने हिसकावून नेल्याचे सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Railway Security Force officers, employees while arresting mobile phone thief of a foreigner
Satara Crime : मध्यरात्री डाॅक्टरच्या घरावर दरोडा; तलवारीचा धाक दाखवून लाखोंची केली लूट

यानंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत मोबाईल चोराच शोध घेण्यास सुरवात केली. मोबाईल चोरांचे फोटो फिलिप यांना मोबाईलवर दाखवले असता त्यांनी त्यातील मोबाईल चोर तत्काळ ओळखला.

सदर संशयित चोरटा सागर बाळू गायकवाड (वय -२१, रा. डिसोझा मैदान) हा असल्याचे पोलिसांना कळाले आणि तो जुगारी असल्याचे लक्षात आले. माहिती मिळताच चोरट्याला पकडण्यासाठी सापळा रचला असता सदर चोरटा हा मनमाड शहरातून त्याला ताब्यात घेत त्यांच्याकडून मोबाईल जप्त करून विदेशी व्यक्तीला सुपूर्द करण्यात आला आहे.

सदर कारवाईच्या मोहिमेत रवींद्र कुमार, सागर वर्मा, मनीष सिंह, धर्मेंद्र यादव, दीपक सानप आदी कर्मचारी सहभागी झाले होते.

Railway Security Force officers, employees while arresting mobile phone thief of a foreigner
Nagar Crime : पाच वर्षांपासून फरार असलेल्या मिथून काळेस आखोणीत अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.