Rajya Rani Express Kherwadi Railway Stationesakal
नाशिक
महापरिनिर्वाण दिनी मुंबईला डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या तरुणांवर चाकू हल्ला; संतप्त नागरिकांकडून 'रेलरोको'
Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Day : संतप्त नागरिकांनी रेल रोको करत जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत गाडी जाणार नाही अशी भूमिका घेतली.
Summary
उद्या 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. मुंबई येथील चैत्यभूमीवर देशभरातील लाखो अनुयायी डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येतात.
निफाड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Day) मराठवाडा येथील काही तरुण हे मुंबईला राज्यराणी एक्सप्रेसने (Rajya Rani Express) अभिवादन करण्यासाठी जात असताना निफाड ते खेरवाडी दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याकडील पैसे हिसकावून घेत त्यांच्यावर चाकू हल्ला केला आणि नंतर खेरवाडी रेल्वे स्थानकावरुन चोरट्यांनी पळ काढला.
