नाशिक : वीजपुरवठा खंडित करून चोरट्यांनी फोडली दानपेटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Crime News

नाशिक : वीजपुरवठा खंडित करून चोरट्यांनी फोडली दानपेटी

येवला (जि. नाशिक) : चोरट्यांनी रात्री वीजपुरवठा (Power Supply) खंडित करून तालुक्यातील पिंपळखुटे तिसरे येथील प्रसिद्ध म्हसोबा मंदिरात दानपेटी दूरवर नेऊन फोडली (Robbery). या दानपेटीतील अंदाजे एक लाख पाच हजारांची रक्कम चोरट्यांनी लांबविली. तसेच मंदिराचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआरही पळवून नेला. (Thieves break donation box of temple robbed by cutting off power supply Nashik Crime News)

पिंपळखुटे येथे म्हसोबा महाराजांचे जागृत देवस्थान असून, येथे भरणारी यात्रा ही मोठी असते. वर्षभर भाविक येथे दर्शनासाठी येतात. येथील वीजपुरवठा खंडित करून म्हसोबा मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारला आहे. सोबतच मंदिरातील डीव्हीआरही पळून नेला आहे. गेल्या वर्षी देखील मंदिरातील दानपेटी फोडण्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आला होता, तोही चोरट्यांनी पळवला.

हेही वाचा: Nashik : सिपेट जागेवरून आमदार भुजबळ-खासदार गोडसे आमने सामने

या घटनेची माहिती पोलिसांना समजतात घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, मनमाड पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे, तालुका पलिस निरीक्षक अनिल भवारी, सहाय्यक निरीक्षक एकनाथ भिसे, हवालदार माधव सानप, पोलिस शिपाई आबा पिसाळ, सतीश मोरे आदींसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक विश्वनाथ काकड यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तालुका पोलिसांत या घटनेची नोंद झाली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे करत आहेत.

हेही वाचा: Nashik : गणपती मूर्ती तयार करण्याच्या कामास वेग

Web Title: Thieves Break Donation Box Of Temple Robbed By Cutting Off Power Supply Nashik Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top