Nashik Crime: चोरटे हुशार, तुम्ही करू नका माहिती उघड! बाहेरगावी जाताना Social Mediaपासून थोडे लांब राहा

Smart Thief
Smart Thiefesakal

Nashik Crime : शाळांना सुट्टी असल्याने अनेक कुटुंब तसेच नागरिक बाहेर फिरण्यासाठी आठ-आठ दिवस जात असून जात असताना आपले फोटो फेसबुक तसेच व्हाट्सअपवर अपलोड केल्याने हीच संधी साधून चोरट्यांचे फावत असल्याने अनेक ठिकाणी चोऱ्या होत आहे.

याचाच फायदा घेऊन चोरटे संबंधित कुटुंबाच्या घराला लक्ष्य करीत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आपण कुठे जात आहोत, त्याचे फोटो तूर्तास तरी व्हायरल करू नका, चोरट्यांना आयती संधी देऊ नका असे आवाहनही करण्यात येत आहे.

पोलिसही उपाययोजना करीत असले तरी चोरट्यांपुढे त्या अपुऱ्या ठरत असल्याचे दिसून येत आहेत. (Thieves smart you should not disclose information Stay away from Social Media while going out Nashik Crime)

एकामागून एक अज्ञात चोरट्यांनी शहरात उच्छाद मांडला आहे. नागरिक त्रस्त असून पोलिसांपुढेही चोऱ्या, घरफोड्या रोखण्याचे आव्हान उभे राहत आहे. बाहेर फिरायला जात असताना किमान मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे.

फिरून परत येईपर्यंत सोशल मीडियावर कुठलेही फोटो शेअर करू नये अशी काळजी घेतली तर चोऱ्या, घरफोड्या रोखता येऊ शकतात असे पोलिसांचे म्हणणे आहे.

कडी कोंडे तोडण्यावर भर

घराला बाहेरून लोखंडी ग्रील असल्यास चोरट्यांना चोरी करता येत नाही. कडीकोयंडा हा साधा असल्याने एका झटक्यात तो तुटतो अनेक घरांच्या ठिकाणी किंवा बिल्डिंगमध्ये कॅमेरा नसल्याने चोरट्यांना चोरी करण्यास फावत आहे.

या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अनेक कुटुंब पर्यटनाला पसंती देत असल्याने जम्मू-काश्मीर, कुलू मनाली, महाबळेश्वर कोकण आधी ठिकाणी जात असल्याने नागरिक हे किमान दोन ते दहा दिवसांचा वेळ काढून जातात.

दरम्यान, काही नागरिक बाहेर जाताना मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्याची काळजी घेतात. मात्र, बहुतांश नागरिक बिनधास्त निघून जातात, तेही चोरट्यांच्या पथ्यावर पडत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Smart Thief
Delhi Crime News: ‘त्या’ अल्पवयीन तरुणीच्या अंगावर २१ वार नव्हे तर…; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर

सोशल मीडियावर राहा जपून

फिरायला जातानाच सोशल मीडियावर व्हिडीओ, रिल्स शेअर करून 'वे टू भुर्रर्र' असे अनेक जण आवर्जून टाकताना दिसतात. ज्या ठिकाणी फिरायला गेले तेथील फोटो आवर्जून शेअर करत असतात. आपले नातेवाईक, मित्रपरिवार यांनी फोटो पाहावेत किंवा आपण घेत असलेला आनंद इतरांना शेअर करावा हा यामागचा उद्देश असला तरी या पोस्टमुळे कुठे, कधी आणि किमान किती दिवसांसाठी गेलात याची खबर चोरट्यांना सहजरित्या मिळते.

"नागरिकांनी फिरायला जाताना पैसे, मौल्यवान वस्तू हे बँकेतच ठेवावेत. घरातील लाईट सतत सुरू ठेवाव्यात. बाहेर जाताना शेजारींना सांगावे. सोसायटी असेल तर वॉचमनला माहिती देणे, फेरीवाल्यास बंदी घालणे या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी सतर्क राहून संबंधित बाबी पाळल्या तर चोऱ्या, घरफोडयांचे प्रमाण कमी होऊ शकते."

- राजेंद्र कुटे, पोलिस निरीक्षक, सिन्नर

कऱणेसिन्नर शहरात पोलिसांकडून उपाययोजना.सिन्नर शहरातील तसेच उपनगरातील चोरीचे प्रकार घडू नये यासाठी सिन्नर शहरातील अकरा मंगल कार्यालयाबाहेर सीसीटीव्हीची नजर असणार आहे.

सिन्नर शहरातील तसेच प्रमुख रस्त्यांवर हॉटेलच्या बाहेर सीसीटीव्हीची नजर आहे. बीट मार्शल, मोबाईल व्हॅन दिवसरात्र उपनगरात फिरत असून ११२ क्रमांकावर एमडीएस मशिनद्वारे आलेल्या कॉल्सबद्दल माहिती घेऊन विषयांचा निपटारा करण्यात येत आहे.

नागरिकांनी घराच्या बाहेर किंवा सोसायटीमध्ये सीसीटीव्ही लावावे. बसस्थानकावर मौल्यवान वस्तू व मोबाईल सांभाळावे. पोलिस कर्मचारी बसस्थानक परिसरात गस्तीवर असून अनुचित प्रकार घडल्यास लागलीच संपर्क करावा असे पोलिस निरीक्षक राजेंद्रकुटे यांनी म्हटले आहे.c

Smart Thief
Nagpur Crime news : प्रेयसीच्या आईने बोलू दिलं नाही म्हणून प्रियकराचा चाकूहल्ला, अल्पवयीन जोडपे फरार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com