Latest Marathi News | काबाडकष्ट करून जमवलेल्या मजुरांच्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thief

नाशिक : काबाडकष्ट करून जमवलेल्या मजुरांच्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला

उमराणे (जि. नाशिक) : येथील प्रसिद्ध कांदा व्यापारी बाळासाहेब रंभाजी देवरे यांचे राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वर संजना आडत म्हणून कांद्याचे खळे आहे. येथे राजेंद्र मोहिते दोन वर्षापासून आपल्या परिवारासह मजुरी असतात. (Latest Marathi News)

काबाडकष्ट करून श्री. मोहिते यांनी जमवलेले पैसे व योगायोगाने माहेरी आलेल्या मोहिते यांच्या दोन्ही मुली व जावयांच्या बॅगा, मोबाईल व रोख पंधरा हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला. मुलींचे आधार, पॅन, शाळेचे दाखले आदी कागदपत्रे देखील चोरी गेल्याची माहिती बाळासाहेब देवरे यांनी दिली. संपूर्ण घटना खळ्यातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मध्यरात्री जेव्हा मोहिते यांना जाग आली तेव्हा हा प्रकार त्यांनी श्री. देवरे यांना कळविला. देवरे यांनी तत्काळ देवळा पोलिसांना माहिती दिली. पोलिस हवालदार राहुल शिंदे व शेख तपास करीत आहे.

हेही वाचा: मुंबईची तहान भागवणारे नाशकातील वैतरणा धरण 80 टक्के भरले

हेही वाचा: पाण्यासाठी संघर्ष : शेंद्रीपाड्याला नव्याने पूल उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Web Title: Thieves Stole Workers Money Nashik Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikCrime News
go to top