लग्नासाठी जमला सारा गोतावळा; चोरट्यांनी सोन्यावर मारला डल्ला

Nashik Crime News
Nashik Crime Newsesakal

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पिंपळगाव बसवंत येथील एका लॉन्समधील (Lawns) लग्न समारंभातून (Wedding Ceremony) एक लाख ६२ हजारांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने (Gold Jewelry) चोरट्यांनी (Thieves) चोरून (Stolen) पोबारा केल्याची घटना घडल्याने लग्न सोहळ्यात एकच खळबळ उडाली. काही काळ लग्न समारंभाच्या कार्यक्रमावर विरजण पडले, त्यावेळी लॉन्स मालकाने तात्काळ पोलिसांना संपर्क करून या घटनेची माहिती दिल्याने लग्न समारंभात घुटमळत दोन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. (Thieves stolen gold jewelry from wedding both thieves arrested Nashik crime News)

Nashik Crime News
Nashik : विहिरीत पडून बैलजोडीचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई महामार्गावर असलेल्या एका खासगी लॉन्समध्ये शनिवारी (ता.२८) विवाहसोहळा सुरू होता. त्यात अज्ञातांनी वर कक्षातील फिर्यादीच्या बॅगेत ठेवलेले एक लाख ५० हजार रुपये रोख रक्कम तर साक्षीदार रंजना यांच्या बॅगेतील १२ हजार आणि ४ ग्रॅम वजनाचे काळे मनी व सोन्याचे मनी मंगळसूत्र असलेली सोन्याची पोत असा एकूण १ लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज, रोख रक्कम व सोन्याची पोत ही संगनमत करुन चोरी केली. म्हणून पिंपळगाव पोलिसा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक ए. बी. काळे तपास करत आहेत.

Nashik Crime News
Nashik : लाभार्थ्यांना मिळणार नियतनानुसार धान्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com