Towing
Towingesakal

नाशिक : टोइंग ठेक्याला तिसऱ्यांदा मुदतवाढ

ऑक्टोबर जानेवारीनंतर पुन्हा मार्च महिन्यात ठेकेदाराने मुदतवाढीसाठी अर्ज केल्याने पोलिसांनी दिली मुदतवाढ

नाशिक : टोइंग ठेक्यास शहर पोलिसांनी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. याआधी ऑक्टोबर २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीसाठी मुदतवाढ मिळाली होती. त्यानंतर जानेवारीत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली होती.

Towing
उमराणेत आता फोन केल्यास जागेवर मिळेल डिझेल | Nashik

मार्च महिन्यात ठेकेदाराने मुदतवाढीसाठी अर्ज केल्याने पोलिसांनी ई- टेंडर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शहरातील वाहतुकीस शिस्त लागण्यासाठी शहर पोलिसांनी खासगी ठेकेदार नेमून टोइंग व्हॅन सुरू केल्या. त्यानुसार दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई केली जात आहे. शहरातील मोजक्याच ठिकाणी कारवाई होत असून अनेकदा वाहन चालक व टोइंग कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांत वाद होत असल्याचे प्रसंग उद्भवतात. दरम्यान, ठेक्याची मुदत संपल्यानंतर मुदतवाढ दिल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १४ एप्रिलनंतर नव्याने ई- टेंडर प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ठेक्यास मुदतवाढ दिली आहे.

Towing
नाशिक : नातेसंबंधात वाणीचे महत्त्व अगाध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com