कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी नाशिक शहरात १७५० ऑक्सिजन बेड

beds
bedse sakal

नाशिक : केंद्र व राज्य शासनाने राज्यात कोरोना तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविल्यानंतर त्याअनुषंगाने तयारीचा भाग म्हणून महापालिकेकडून एक हजार ७५० ऑक्सिजन बेडची निर्मिती केली जात आहे. महिंद्रा, टिडीके व जिंदाल या कार्पोरेट कंपन्यांचे त्यासाठी साहाय्य मिळणार आहे. (For third wave of Corona 1750 oxygen beds being provided in Nashik city)

कोरोना दुसरी लाट भयावह ठरली. दुसऱ्या लाटेने महापालिकेच्या पायाभूत सुविधांमधील त्रुटी समोर आल्या. रुग्णसंख्या वाढल्याने प्रथम बेडचा तुटवडा भासला. त्यानंतर ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडचा तुटवडा दिसून आला. मार्च महिन्यात ऑक्सिजनची कमतरता भासली. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये पुरेसा ऑक्सिजन असला तरी खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनअभावी रुग्ण हलविण्याची वेळ आली. त्यामुळे आता कोरोना तिसऱ्या लाटेच्या शक्यतेनंतर दुसऱ्या लाटेत निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. उद्योजकांच्या आयमा संस्थेकडून अंबडमध्ये ५०० बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारले जात आहे. एक हजार मीटरचे चार शेड येथे उभारले जात असून, तेथे ऑक्सिजन प्लॅन्ट, पाचशे बेड, सलाईन स्टॅन्ड यासह अन्य बाबी पुरविल्या जाणार आहे. त्या व्यतिरिक्त महापालिकेकडून अंतर्गत ऑक्सिजन पाइपलाइन, विद्युत व्यवस्थेसाठी महापालिका सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी खर्च करणार आहे.

महिंद्रा, टीडीके, जिंदालचे साहाय्य

महिंद्रा कंपनीकडून १०० पीएसए प्लॅन्ट, टीडीके व जिंदाल कंपनीकडून ८०० पीएसए प्लॅन्ट दिले जाणार आहे. जनरेटर पुरविण्यासाठी महिंद्रा कंपनीकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. संभाजी स्टेडिअममधील दोनशे सर्वसाधारण बेडचे रूपांतर ऑक्सिजन बेडमध्ये, तर ठक्कर डोममधील तीनशे बेडचे रूपांतर ऑक्सिजन बेडमध्ये केले जाणार आहे. मीनाताई ठाकरे स्टेडिअममध्ये दोनशे व मविप्र रुग्णालयात दीडशे ऑक्सिजन बेडची व्यवस्था यापूर्वीच करण्यात आली आहे. असे एकूण १७५० ऑक्सिजन बेडची व्यवस्था तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी केली जात आहे.

असे आहे नियोजन

  1. अंबड कोविड सेंटर - ५००

  2. संभाजी स्टेडिअम - २००

  3. ठक्कर डोम - ३००

  4. नवीन बिटको - ३००

(For third wave of Corona 1750 oxygen beds being provided in Nashik city)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com