सोग्रस : तहानलेल्या मोराचा पाण्याच्या शोधात विहिरीत पडून मृत्यू | latest nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

peacock

तहानलेल्या मोराचा पाण्याच्या शोधात विहिरीत पडून मृत्यू

सोग्रस (जि. नाशिक) : चांदवड तालुक्यातील पाथरशेंबे शिवारात पाण्याच्या शोधात असलेल्या तहानलेल्या मोराचा विहिरीत पडून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ३) दुपारच्या सुमारास घडली.

हेही वाचा: Nashik : बिबट्याच्या हल्ल्यात 6 शेळ्या ठार

दत्तू ठाकरे (रा. पाथरशेंबे) यांच्या गट नंबर ३१७ मधील विहिरीत दुपारच्या सुमारास दोन ते अडीच वर्षे वयाच्या मोराचा मृतदेह आढळून आला. यासंदर्भात ठाकरे यांनी चांदवड वन विभागाच्या कार्यालयात कळविले. घटनास्थळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन मोराचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून चांदवड वन विभागाच्या वसाहतीमधील मोकळ्या जागेत मोरावर अंत्यसंस्कार केले.

हेही वाचा: Summer Holiday : उन्हाळी सुट्टीमुळे पर्यटनाला चालना

Web Title: Thirsty Peacock Fall Into A Well And Drowned While Searching For Water In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top