Nashik : बिबट्याच्या हल्ल्यात 6 शेळ्या ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

leopard

Nashik : बिबट्याच्या हल्ल्यात 6 शेळ्या ठार

सोयगाव (जि. नाशिक) : कौळाणे (गा.) शिवारातील शेतात बिबट्याने (Leopard attack) शेळ्यांवर केलेल्या हल्ल्यात सहा शेळ्या ठार झाल्या. येथील दीपक मोरे यांच्या पट्टी शिवारातील शेतातील गोठ्यात शेळ्या बांधलेल्या होत्या. नजीकच कोंबड्याही होत्या. यातील सहा शेळ्यांवर बिबट्याने पहाटेच्या सुमारास हल्ला करून त्यांना ठार केले. गेल्या दोन- तीन दिवसांपासून परिसरात बिबट्याचा वावर होता. मंगळवारी (ता. १७) सकाळी श्री. मोरे नेहमीप्रमाणे शेतात गेले असता बिबट्याच्या हल्ल्यात गोठ्यात असलेल्या अठरा कोंबड्या व सहा शेळ्या मृत अवस्थेत आढळून आल्या. (Six goats killed in leopard attack Nashik News)

त्यांनी वन विभागांशी संपर्क करून या घटनेची माहिती दिली. वनविभागाचे कर्मचारी गोरेकर यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. बिबट्याच्या हल्ल्यामुले श्री. मोरे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.