जिल्हाधिकारी म्हणताएत...''नाशिककरांनो हे वागणं बरं नव्हे, अन्यथा सहा महिने तुरुंगवास"

suraj-mandhare-2.jpg
suraj-mandhare-2.jpg

नाशिक : जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुलें...तोचि साधु ओळखावा,
 देव तेथेंची जाणावा... या तुकोबांच्या अभंगाप्रमाणे कठीण काळात अनेकांच्या मदतीला धावणारे नाशिककर खऱ्या अर्थाने 'हेलपिंग हँडस' ठरले, ज्याचं सर्वच माध्यमांतुन गोड कौतूक झालं. दुसरीकडे मात्र सोशल मीडियाच्या वापराबाबत असलेलं अज्ञान अन् भविष्यातील परिणामांची तमा न बाळगता कोरोनाबाधितांची ओळख स्पष्ट होईल, अशी माहिती समाज माध्यमातून व्हायरल होत आहे. इतकंच नव्हे तर चांदवडच्या 'त्या' रुग्णाचा तर फोटोचं व्हायरल झाल्याने नाशिक जिल्ह्यातील नागरिकांची असंवेदनशीलता समोर आली आहे.

भविष्यात सामाजिक बहिष्काराला सामोरं जावं लागेल...

आपण परदेशातून आलो नाही अन् आपल्या संपर्कात देखील कुणी परदेशातलं नाही. त्यामुळे कोरोना होऊचं शकत नाही. हा समज गेल्या काही दिवसांत कुठलाही प्रवास इतिहास नसलेले नागरिक बाधित असल्याच्या अहवाल समोर आल्याने गैरसमज ठरला आहे. चांदवडचा रुग्ण हे त्यातलंच एक उदाहरण. खरं तर टोल नाक्यावर कर्तव्य पार पाडणाऱ्या 'या' तरुणाचं तबलिगीसारखं कुठलंही बेजबाबदार वागणं नाही किंवा प्रवास इतिहासही नाही, तरीही अलगद त्यालाही याचा संसर्ग झाला. सध्या तो उपचार घेत आहे आज ना उद्या तो ठणठणीत बरा होऊन घरी येईलही मात्र या काळात त्याचे फोटो व्हायरल करण्याचं वर्तन त्याच्यासह कुटुंबियांना भविष्यात सामाजिक बहिष्काराला सामोरं जावं लागेल या पद्धतीचं आहे. तशी भीती देखील व्यक्त केली जात आहे. कोणताही रुग्ण बाधित असल्याची माहितीसमोर येताच त्याचं नाव गोपनीय ठेवणं अपेक्षित असतांना चांदवडच्या या रुग्णाची ओळख स्पष्ट करणारी माहिती त्याचं नाव आणि फोटोसह व्हायरल झाली. त्यामुळे कोरोना बाधितांचे अहवाल आणि प्रक्रिया गोपनियेतचा भंग करत आहे का? हा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. 

हरवत चाललेली संवेदनशीलता मात्र चिंता व्यक्त करणारी...

सोशल मीडियाच्या वापराबाबत अनेक सूचना निर्गमित करूनही लोकांचं हे बेजबाबदारपणाचं वागणं अनेकांचं आयुष्य उद्धवस्त करू शकते. या जाणिवेचा अभाव सध्या नाशिक जिल्ह्यात प्रकर्षाने दिसून येत आहे. काही अपवाद वगळता लासलगाव येथील तरुणाचं प्रकरण देखील असंच. अनेकांनी आपल्या रोगप्रतिकारक शक्तीच्या जोरावर कोरोनाला हरवलं आहे मात्र माणसातील हरवत चाललेली संवेदनशीलता मात्र चिंता व्यक्त करणारी ठरत आहे. जिल्ह्यात सलग दोन अशी प्रकरणे घडली असतांना आता शासनाकडून. बेजबाबदारपणे वागणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

तर सहा महिने तुरुंगवास... 

कोरोनाबाधितांची ओळख उघड करणारा मजकूर व्हायरल होणं हे फार गंभीर आहे. वेळोवेळी आवाहन करूनही सोशल मीडियाचा बेजबाबदारपणे वापर सुरू आहे. अशा प्रकारावर आता विशेष लक्ष ठेवण्यात येईल. कलम १८८ अंतर्गत कारवाई करून अशा बेजबाबदार लोकांना सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागेल. - सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक.

कोरोना संदर्भात चुकीची माहिती, धार्मिक तेढ वाढवणारा मजकूर सोशल मीडियातून व्हायरल केल्याने नाशिक जिल्ह्यात दहा गुन्हे दाखल करून पंधरा आरोपीना ताब्यात घेण्यात आलं आहे. यासाठी विशेष कक्षात चोवीस तास मॉनिटरिंग सुरू आहे. कोरोनाबाधित रुग्णांची ओळख पटविणारी माहिती सोशल मीडियात व्हायरल करणाऱ्यांवर नोंदविण्यात येतील. - सुभाष अनमूलवार, सायबर पोलीस स्टेशन, नाशिक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com