Sammed Shikhar Pilgrimage Case : झारखंड सरकारचा जैन धर्मियांकडून निषेध

Jain brothers protesting outside the Collectorate for various demands in support of 'Parasnath Parvatraj' in Jharkhand.
Jain brothers protesting outside the Collectorate for various demands in support of 'Parasnath Parvatraj' in Jharkhand.esakal

नाशिक : जैन धर्मियांचे पवित्र सिद्धक्षेत्र महा पर्वतराज श्री सम्‍मेद शिखरजी हे पर्यटन क्षेत्र घोषित केल्‍याचा झारखंड सरकारच्‍या निर्णयाचा निषेध करण्यात आला. बुधवारी (ता.२१) श्री वर्धमान स्‍थानकवासी जैन श्रावक संघातर्फे जिल्‍हा प्रशासनाला निवेदन देतांना निषेध नोंदविला. जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या आवारात सकाळी बाराच्‍या सुमारास जैन समाज बांधव ऐकवटले होते. (Sammed Shikhar Pilgrimage Case protest by Jains against Jharkhand Government nashik news)

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

Jain brothers protesting outside the Collectorate for various demands in support of 'Parasnath Parvatraj' in Jharkhand.
Nandurbar News: रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; गुजरातच्या महिलेला परत दिला लाखांचा ऐवज!

जिल्‍हाधिकारींना दिलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे, की जैन धर्मियांच्‍या २४ तीर्थांपैकी २० तीर्थकर ज्‍या पवित्र भूमीत मोक्षाला गेले अशा झारखंड राज्‍यातील मधुबन (ता. गिरडीह येथील महा पर्वतराज श्री सम्‍मेद शिखरजी क्षेत्र, झारखंड सरकारने पर्यटन क्षेत्र घोषित केले आहे. या निर्णयामुळे त्‍या ठिकाणी मांसाहारी हॉटेल,पब, बार आदी बाबी समाजाच्या अहिंसा तत्‍वाविरुद्ध असणार आहे. जैन समाजातील प्रत्‍येक व्‍यक्‍ती या ठिकाणी जाऊन २० तीर्थकरांच्‍या पवित्र मोक्ष भूमीवर पहाड वंदना अनवाणी करण्याची इच्‍छा बाळगतो.

परंतु सरकारच्‍या निर्णयामुळे जैन समाजाचे श्रद्धास्‍थान असलेल्‍या पवित्रभूमीचे पावित्र्य धोक्‍यात आले आहे. या निर्णयामुळे देशभरातील सकल जैन समाजात संतापाची लाट उसळली आहे. हा निर्णय रद्द करण्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्‍यासह झारखंडचे मुख्यमंत्री यांना निवेदन दिले जाणार आहे.

नाशिक जिल्‍हा प्रशासनालादेखील या निवेदनाद्वारे संबंधित निर्णय रद्द करण्याची मागणी नाशिक सकल जैन समाज करत आहे. निवेदनासोबत विविध परीसरातील सकल जैन समाजाने पाठींबा दर्शविला. दरम्‍यान बुधवारी निवेदन देतांना जिल्‍हाधिकारी कार्यालयात समाज बांधव एकवटले होते. कार्यालयाच्‍या प्रवेशद्वारावर घोषणा देतांना झारखंड सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

Jain brothers protesting outside the Collectorate for various demands in support of 'Parasnath Parvatraj' in Jharkhand.
Nashik News : बिलांचे ठराविक ठेकदारांनाच वाटप; इंजिनिअर्स असोसिएशनची अधीक्षक अभियंत्यांकडे तक्रार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com