Latest Crime News | घरभाड्याचे डिपॉझिट न देता साडेतीन लाखांची फसवणूक; जीवे मारण्याची धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime News : घरभाड्याचे डिपॉझिट न देता साडेतीन लाखांची फसवणूक; जीवे मारण्याची धमकी

नाशिक : गंगापूर रोड, सोमेश्वर परिसरात भाड्याने फ्लॅट देण्यासाठी डिपॉझिट म्हणून घेतलेली रक्कम घरमालकाला न देता भाडेकरूंची साडेतीन लाखांची फसवणकू केली. तसेच सदरील रक्कमेसाठी तगादा लावल्याने संशयिताने भाडेकरूंनाच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे. (Three half lakhs fraud without paying house rent deposit Death threats by dealer Nashik Latest Crime News)

गणेश पांडुरंग पाटील (२५, रा. योगेश हॉटेलसमोर, खुटवडनगर), निखिल प्रकाश मुदीराज ( ३७, रा. संगीत रेसीडेन्सी, गोविंदनगर) अशी संशयितांची नावे आहेत. मोसेस टोटलीसिंग बाबालोला (रा. सेंडिन टॉन, दक्षिण आफ्रिका. सध्या रा. आस्था रेसीडेन्सी, गंगापूर रोड) या युवकाच्या फिर्यादीनुसार, मोसेस बाबालोला व त्याच्या मित्रांना गंगापूर रोड, सोमेश्वर परिसरात भाड्याने फ्लॅट पाहिजे होते. त्यासाठी त्यांचा संशयित पाटील व मुदीराज यांच्याशी संपर्क आला. दोघा संशयितांनी मोसेसकडून ऑनलाईन ६० हजार रुपये घेतले.

त्यानंतर त्यांच्या काही मित्रांकडून एकूण ३ लाख ३७ हजार रुपयांची रक्कम घेतली. मात्र फ्लॅट भाड्याने देताना संशयितांनी डिपॉझिटची रक्कम घरमालकांना दिले नाहीत. त्यामुळे घरमालकांनी भाडेकरूंकडे डिपॉझिटची मागणी केली. त्यानंतर मोसेस व त्याच्या मित्रांनी संशयित दोघांकडे वारंवार डिझॉझिटच्या पैशांची मागणी केली असता, संशयितांनी टाळाटाळ केली. नंतर संशयितांनी फोन घेणे टाळत त्यांचे ऑफिसही बंद केले.

Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

हेही वाचा: Measles Disease : नाशिक ग्रामीणमध्ये गोवरची 8 संशयित

दरम्यान, गेल्या सोमवारी (ता. २१) संशयित गणेश पाटील याने मोसेस याच्या फोनवर संपर्क साधून पैसे मागितल्यास दोन्हींना भावांना जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या मोसेस याने मुंबई नाका पोलिसात ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित निखिल मुदीराज यास बुधवारी (ता. २३) पहाटे दीडच्या सुमारास अटक केली आहे. सदरील गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक डी.व्ही. शेळके हे करीत आहेत.

यांच्याकडून घेतले पैसे

बाबालोला याने संशयित गणेश पाटील याला १७ हजार ऑनलाईन पैसे दिले. तर, संशयित मुदिराजला ४३ हजार रोख रक्कम दिले होते. बाबलोला याचा मित्र डरायस गोल याने २५ हजार, डेटीमले एबार याने १० हजार, डेविड डेमीने ५५ हजार, बुसीने ५५ हजार, बरनाडोने ४२ हजार, लॉरिनने ३० हजार आणि नोबर्ट याने ६० हजार रुपये असे एकूण २ लाख ७७ हजार रुपये वेळोवेळी संशयितांना दिले. संशयित मुदिराजची कसून चौकशी सुरू असल्याचे मुंबई नाक्याच्या गुन्हे पथकाने सांगितले.

हेही वाचा: Nashik News : पेठ रोडच्या दुरवस्थेचे घोंगडे Smart Cityच्या खांद्यावर