Nashik Crime News : घरफोडीच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Nashik Crime News : घरफोडीच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक

ओझर (जि. नाशिक) : येथील आर के कॉलनी परिसरातील बंद बंगल्यात चोरी करण्याच्या उद्देशाने अंधारात दबा धरुन बसलेल्या तिघा संशयित चोरट्यांनी ओझर पोलिसांच्या गस्ती पथकाने अटक केली. (Three persons preparing to burglary arrested Nashik Crime News)

हेही वाचा: Nashik Crime News : मालेगाव येथे छाप्यात गुंगीचे औषध, गोळ्या जप्त!

ओझर पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार अनुपम जाधव, अमोल गांगुर्डे, जितेंद्र बागूल, रामदास घुमरे शुक्रवारी (ता.२३) पहाटे आर के कॉलनी भागात गस्त घालत असताना मीनाक्षी राणे यांच्या बंगल्याच्या संरक्षण भिंतीजवळ अंधारात तीन जण संशयास्पद हालचाल करत असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ त्याच्याजवळ जात त्यांना हटकले. पोलिसांनी पाहताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पोलिसांनी पाठलाग करत दीपक मोरे (वय १९, रा. खेरवाडी ता. निफाड), योगेश गांगुर्डे (वय २१, रा. भडके वस्ती), अजय गुंबाडे (वय १९, रा. पिंपळगाव धूम) या तिघांना ताब्यात घेत अटक केली. यावेळी त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने हे तिघे बंगल्यात चोरीच्या उद्देशाने आल्याचे पोलिसांना खात्री पटली. याप्रकरणी तिघांवर ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा: Nashik News : दिंडोरी तालुक्यात बिबट्यांची दहशत! 2 दिवसापासून सलग दर्शन