

Shan E Hind Clarifies Stand Amid Photo Controversy
Esakal
टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, मालेगाव महानगरपालिकेत ज्या उपमहापौरांच्या दालनातील फोटोवरून वाद सुरू झाला त्या शान ए हिंद निहाल अहमद यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केलीय. सध्या उपमहापौर दालनाचं काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावणार असल्याचं विधान शान ए हिंद निहाल अहमद यांनी केलंय. या विधानामुळे पुन्हा एकदा वाद भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.