Brave Mother: बाळ घरात अडकलं अन् 'हिरकणी'नं बाळाला वाचवण्यासाठी जे केलं ते वाचून उडेल थरकाप!

Trupti jagdale
Trupti jagdaleesakal

Nashik News : नाशिक येथील पेठरोड परिसरातील एका २८ वर्षीय विवाहितीने स्वतःचा जीव धोक्यात टाकून दीड महिन्याचा जीव वाचविण्यात यश मिळविले आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता अक्षरशः चौथ्या मजल्यावरच्या चार फुट ऊंच भिंतीची गॅलरीतून उडी मारली.

मागच्या बाजुला असलेल्या फुटभर रुंदी असलेल्या ग्रीलच्या बाजुने असलेल्या पाईपच्या सहाय्याने आपल्या फ्लॅटच्या खिडकीपाशी आली आणि पुन्हा चार फुटांची भिंतीवरुन उडी मारत आपल्या घरात शिरली.

अन् आपल्या बाळा जवळ पोहचली. या हिरकणीचा डंका नाशिक जिल्ह्यासह शिरपूर मध्ये देखील गाजतोय अशी ती हिरकणी आई तृप्ती. (To save one half month old baby mother trupti put life in danger climb to Reached fourth floor nashik news)

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार (ता.२९) रोजी स्वप्नील जगदाळे-सोनार (रा. शिरपूर हल्ली मुक्काम सुंदरम पॅलेस फ्लॅट नंबर १९, चौथा मजला, शरदचंद्र पवार मार्केट पाठीमागे अष्टविनायक नगर, पेठ रोड नाशिक) यांच्या परिवारात साखरपुडाचा कार्यक्रम असल्यामुळे ते व त्यांची ३ वर्षाची मुलगी मृणमय हिला सोबत घेवून शिरपुरात आले, मात्र पत्नी तृप्ती व दीड महिन्याचा बाळ मल्हार जगदाळे यास उन्हाचा त्रास होईल म्हणून त्यांनी आणले नाही व नाशिक येथेच राहू दिले.

२२ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दुपारच्या सुमारास दीड महिन्याच्या बाळाला झोपवून झोळीत टाकल्यानंतर तृप्ती जगदाळे यांनी घराचा केरकचरा काढला त्यानंतर तो कचरा मुख्य दरवाजाच्या बाहेर असलेल्या केरकचरा डब्यात टाकण्यासाठी गेल्या असतांना जोराच्या हवेने दरवाजा लॉक झाल्यामुळे तृप्तीची तारांबळ उडाली.

त्यानंतर तिच्यात हिरकणी निर्माण झाल्यानंतर तीने आपल्या बाळाजवळ जीव संकटात टाकून पोहचल्याची चित्तथरारक घटना नाशिक येथे घडली आहे.

माय नावाच्या सजीव प्राण्यात निसर्गाने मुळातच ममत्वाचे मध भरभरुन दिलेले असते. आपल्या पोटच्या लेकरासाठी स्वत:चे सर्वस्व त्यागते तिला आई म्हणतात. आपल्या तान्हुल्याला कवेत घेणेसाठी अवघड असा कडा उतरुन येणाऱ्या हिरकणीची कथा आपण ऐकली आहे, तशीच एक गोष्ट सध्या नाशिक येथे घडली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Trupti jagdale
Pune News : पुण्यातील शास्त्रज्ञांनी तयार केले अवघ्या काही मिनिटांत मातीची गुणवत्ता तपासणारे उपकरण

आपला पती गावाला गेलेला आहे. घरात फक्त ती आणि तिचं दिड महिण्याचं बाळ त्याला झोळीत बसवुन तिने घरातला केर काढला नि तो व्हरांड्यातल्या डस्टबीनमध्ये टाकणेसाठी दारा बाहेर आली. तेवढ्यात हवेच्या झोताने खाड्कन दरवाजा बंद झाला नि लॉक ही अडकले.

चाव्या घरातच व मोबाईलही घरातच, ती घाबरली बापरे, बाळ झोळीत आणि दरवाजा लॉक? दुदैर्वाने शेजारच्या फ्लॅटमधील शेजारीही गावाला गेलेले. ती पुरती बिथरली तिला काहीच सुचेना कुणाला फोन करावा तर मोबाईल आत, आता काय करावे? तिला दिसत होते ते घरात अडकुन पडलेलं झोळीतलं दिड महिण्याचं बाळ, बापरे, आता त्याचं काय होईल? ती अधिकच घाबरली.

चौथ्या मजल्यावरचा फ्लॅट. दुपारची सामसुम, क्षणाचा विलंब न करता तिच्यातल्या आईने चौथ्या मजल्यावरच्या चार फुट ऊंच भिंतीची गॅलरीतुन उडी मारुन मागच्या बाजुला असलेल्या फुटभर रुंदी असलेल्या ग्रीलच्या बाजुने तेथल्या पाईपच्या सहाय्याने आपल्या फ्लॅटच्या खिडकीपाशी आली आणि पुन्हा चार फुटांची भिंतीवरुन उडी मारत आपल्या घरात शिरली.

आधी बाळाला पोटाशी लावले अन् मग आतुन दरवाजा उघडला़ नि सुटकेचा श्वास सोडला. क्षणभराचा किस्सा पण गोंधळुन टाकणारा.

Trupti jagdale
Investment Tips: सोने-चांदी की शेअर बाजार, गुंतवणुकीसाठी यापैकी कोणता पर्याय चांगला?

संध्याकाळी सर्वजण घरी आल्यावर सर्वांना ही गोष्ट कळली. तिच्या बहादुरीचे कौतुक केले. चौथ्या मजल्यावरुन खाली पाहीले तरी भिती वाटुन चक्कर येते आणि ही माय चक्क ड्रेनेज पाईपच्या सहाय्याने आंत गेली? सर्वांना आश्चर्य, असे केले असते, तसे केले असते असे सल्लेही दिले.

पण संकट जेंव्हा आं वासुन उभे ठाकते तेंव्हा मती गुंग होते. काहीच सुधरत नाही. त्यावेळी जे सुचते तेच अंतीम असते, या बाईतली आईला जे धैर्य सुचले तेच महत्वाचे.

मातृत्वाचा तो विजय होता, का ग बाई, चौथ्या मजल्याच्या बॅक गॅलरीतुन तुला पडायची भिती नाही का वाटली? तेंव्हा ती म्हणाली, मला त्यावेळी काहीच दिसत नव्हतं, मी खालीही पाहत नव्हती. मला दिसत होतं ते फक्त माझं बाळ...

Trupti jagdale
Used Cars : देशात सेकंड-हँड गाड्यांचं मार्केट डाऊन, नवीन गाड्यांची होतेय जबरदस्त विक्री! जाणून घ्या कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com