esakal | जिल्‍ह्यात कोरोना मृत्‍यूचा विस्‍फोट सुरूच! दिवसभरात ६५ मृत्‍यू
sakal

बोलून बातमी शोधा

Death Corona Virus

जिल्‍ह्यात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांची संख्येत कमालीची घट होत असली तरी कोरोनामुळे होणार्या मृत्‍यूंनी गंभीर रुप धारण केले आहे. मंगळवारी (ता.25) दिवसभरात 65 बाधितांचा मृत्‍यू झाल्‍याची नोंद असून, यात नाशिक शहरातील सर्वाधिक 38 बळींचा समावेश आहे. (today 65 corona patients died in nashik district)

जिल्‍ह्यात कोरोना मृत्‍यूचा विस्‍फोट सुरूच! दिवसभरात ६५ मृत्‍यू

sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : जिल्‍ह्यात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांची संख्येत कमालीची घट होत असली तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूंनी गंभीर रुप धारण केले आहे. मंगळवारी (ता.25) दिवसभरात 65 बाधितांचा मृत्‍यू झाल्‍याची नोंद असून, यात नाशिक शहरातील सर्वाधिक 38 बळींचा समावेश आहे. जिल्‍ह्‍यात कोरोना मृत्‍यूचा महाविस्‍फोट सुरुच असून, पाचव्‍यांदा पन्नासपेक्षा अधिक बाधितांचा दिवसभरात मृत्‍यूची नोंद झाली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्‍यात 14 हजार 400 ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण आहेत.

नाशिक महापालिका क्षेत्रातील 38

तीनच दिवसांपूर्वी गेल्‍या रविवारी (ता.22) जिल्‍ह्यात 58 बाधितांचा बळी गेला होता. यापूर्वी एप्रिलमध्ये सलग तीन दिवस मृतांची संख्या पन्नासपेक्षा अधिक राहिली होती. दरम्‍यान मंगळवारी (ता.25) जिल्‍ह्‍यात कोरोनामुळे 65 बाधितांच्‍या मृत्‍यूची नोंद झाली आहे. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील 38, नाशिक ग्रामीणमधील 24, मालेगावच्‍या तिघांचा समावेश आहे. शहरात सिडको, पंचवटी, सातपूर, नाशिकरोड भागातील मृतांचे प्रमाण अधिक आहे. तसेच शहराला लागून असलेल्‍या देवळाली कॅम्‍प येथील एक तर शिंदे गाव येथील दोन मृतांचा नाशिक ग्रामीणमधील मृत्‍यू संख्येत समावेश आहे. ग्रामीण भागात इगतपुरीत चार, येवल्यासह सटाणा, सिन्नर तालुक्‍यातील प्रत्‍येकी तिघांचा मृत्‍यू झाला आहे. निफाड, चांदवड, दिंडोरी तालुक्‍यातील प्रत्‍येकी दोन मृत्‍यू झत्तले आहेत. तर मालेगाव ग्रामीण व नांदगावच्‍या प्रत्‍येकी एका बाधिताचा कोरोनाने बळी घेतला.

हेही वाचा: रुग्णालयाकडून भरमसाठ बील; 'त्यांनी' काढले चक्क अंगावरचे कपडे

मंगळवारी नाशिक महापालिका क्षेत्रात 337 पॉझिटिव्‍ह आढळले असून, नाशिक ग्रामीणमध्ये 411, मालेगावच्‍या सतरा रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला आहे. दुसरीकडे नाशिक महापालिका क्षेत्रात 225, नाशिक ग्रामीणमध्ये एक हजार 272 रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. कोरोनामुक्‍तांमध्ये मालेगावच्‍या 47 रुग्‍णांचा समावेश आहे.

सायंकाळी उशीरापर्यंत जिल्‍ह्‍यात तीन हजार 620 रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यात नाशिक ग्रामीणमधील दोन हजार 118, नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार 317 तर मालेगावच्‍या 185 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णायले व गृहविलगीकरणात एक हजार 597 रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार 447 रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात पाच, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात दहा रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील नव्वद, तर मालेगावच्‍या 45 रुग्‍णांचा यात समावेश आहे.

(today 65 corona patients died in nashik district)

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यातील ननाशी परिसरात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का