नाशिक रोड

नाशिक रोड
Published on
बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार नाशिक रोड : पळसे गावाजवळ सिटीलिंक बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. भाऊसाहेब किसन गायखे (४३, रा. गायखे मळा) हे बुधवारी (ता. १३) दुपारी चारच्या सुमारास शिंदे गावाकडे सर्व्हिस रोडने दुचाकीवरून जात असताना सिन्नरकडून येणाऱ्या सिटीलिंक बसने (एमएच- १५- जीव्ही- ७८६४) गायखे यांना धडक दिली. गायखे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास हवालदार शेख करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com