विजेचा धक्का लागून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू; महावितरण कंपनीवर केले गंभीर आरोप.

विजेचा धक्का लागून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू; महावितरण कंपनीवर केले गंभीर आरोप.
Published on
फोटो- 14096 विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू दिंडोरी ः तालुक्यातील मडकीजांब येथे विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी वीज महावितरण कंपनीच्या हलगर्जीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला. सोमवारी (ता. २२) सायंकाळी पावसामुळे येथे ओल निर्माण झाली होती. गायकवाड वस्तीलगत राहणाऱ्या भूषण संतोष गायकवाड (वय २२) याला मंगळवारी (ता. २३) सकाळी विजेचा धक्का बसल्याने तो जागीच कोसळला. त्याला दिंडोरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. भूषण दिंडोरी येथील फायनान्स कंपनीत कामाला होता. भूषणला दोन भाऊ असून, वडील मजुरीचे काम करतात, तर आई आशासेविका आहे. वीज कंपनीच्या हलगर्जीमुळे भूषणचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com